Mango Festival 2024 : कृषी पणन मंडळाच्या ‘आंबा महोत्सव २०२४’ ला प्रारंभ

Board of Agriculture Marketing : महोत्सवात दरवळ अस्सल हापूस, पायरी आणि केशर आंब्याचा
Mango Festival
Mango FestivalAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pune Nrews : पुणे ः हापूस आंब्याचा हंगाम बहरात आला असून, ग्राहकांना अस्सल कोकणचा हापूस रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवरील राज्य कृषी पणन मंडळाच्या २३ व्या हापूस आंबा महोत्सवाला सोमवारपासून (१ एप्रिल) प्रारंभ झाला. महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील शेतकऱ्यांनी आपला अस्सल आंबा विक्रीस आणला आहे. यंदा आंबा मुबलक असल्याने दर देखील रास्त असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


राज्य कृषी पणन मंडळासह पुणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील तसेच राज्यातील केशर आंबा उपलब्ध झाला आहे. आंब्यासह महोत्सवात ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडील काही महिला बचत गटांचाही सामावेश असून, अस्सल ग्रामीण पदार्थ देखील उपलब्ध आहेत. महोत्सवात सुमारे १२५ स्टॉल असून, मार्केट यार्ड येथील पीएमटी बस डेपो शेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत महोत्सव सुरू झाला आहे.

यंदा मुबलक हापूस
गेल्या वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस आदी विविध कारणांनी आंब्याचे उत्पादन घटले होते. तर ऐन अक्षय तृतीयेला आंबाटंचाई निर्माण झाली होती. मात्र या वर्षी हवामानाने साथ दिल्याने आंबा मुबलक उपलब्ध असल्याने ग्राहकांनी जास्तीत जास्त आंबा खरेदी करण्याचे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक कदम यांनी केले आहे.

Mango Festival
Mango Festival : छत्रपती संभाजीनगरात आजपासून आंबा महोत्सव

माझी २ हजार ५०० झाडे असून, या वर्षी हवामानाने साथ दिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के आंबा जास्त आहे. पहिल्या मोहोराला थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्याने काही प्रमाणात कमी फळ लागली तर उन्हाळा जास्त असल्याने आंबा भाजत असून, डागी आंबा जास्त आहे. त्यामुळे पेटीतही आंबा भाजत असल्याने काही प्रमाणात आंबा खराब होण्याचे प्रमाण आहे. गेल्या वर्षी आंबा कमी असल्याने ४-५-६ डझनच्या पेटीचा दर ५ ते ६ हजार रुपये तेच दर या वर्षी ४ ते ४ हजार ५०० रुपये एवढे आहेत.
- विपुल गोंणबरे,
परचुरी, ता.संगमेश्वर - (संपर्क ९११९५६२४०५)
सुभाष लांजेकर, फुंणगूस, ता. संगमेश्वर ( संपर्क -९७६७६४९०६६)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com