Climate Smart Agriculture : जोखीम व्यवस्थापन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे

Risk Management Technology :‘हवामान अनुकूल स्मार्ट शेती’वरील कार्यशाळेतील सूर
Climate Smart Agriculture
Climate Smart AgricultureAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा 
Parbhani News : परभणी : ‘‘बदलत्या हवामानामुळे मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांपुढे असंख्य आव्हाने निर्माण झाली आहेत. हवामान अनुकूल स्मार्ट शेतीसाठी जोखीम व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागेल.

शेती कामांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आदी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात प्रवेशाच्या संधी आहेत,’’ असा सूर ‘स्मार्ट शेती’ कार्यशाळेत उमटला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत मंगळवारी (ता. २६) व बुधवारी (ता. २७) ‘अन्न सुरक्षा व शाश्‍वततेसाठी  हवामानानुकूल स्मार्ट शेती’ ही कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते.

अमेरिकेतील नेब्रासका विद्यापीठातील जैवप्रणाली व कृषी अभियांत्रिकी विभागाचे शास्‍त्रज्ञ डॉ. संतोष पिटला, मिसिसिपी राज्य विद्यापीठ (अमेरिका) कृषी हवामानशास्त्र डॉ. प्रकाश कुमार झा, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. भगवान आसेवार, ‘नाहेप’‍पाचे मुख्‍य संशोधक डॉ. गोपाल शिंदे, डॉ. सय्यद इस्माईल आदी उपस्थित होते.

Climate Smart Agriculture
Richfield Fertilizers : फर्टिगेशन तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांपर्यंत नेणारा कृषी शास्त्रज्ञ

डॉ. पिटला म्‍हणाले, ‘‘अमेरिकेत हवामान स्मार्ट शेतीसाठी तंत्रज्ञानाची साधने म्हणून रोबोटिक्सचा वापर शेतीत केला जातो. भारतात शेती क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा वापर भविष्‍यात होईल.

देशातील शेतकऱ्यांना उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञान वापराबाबत विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व संशोधकांनी पुढाकार घ्‍यावा.’’

डॉ. मणी म्‍हणाले, ‘‘विकसित राष्‍ट्रात डि‍जिटल शेती तंत्रज्ञानाचा वापर मोठा आहे. या तंत्रज्ञानाचा लाभ मराठवाडा व राज्‍यातील शेतकऱ्यांना व्हावा, याकरिता परभणी कृषी विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. विद्यापीठाने अनेक आंतरराष्ट्रीय व राष्‍ट्रीय संस्थांशी सामंजस्‍य करार केले आहेत.

प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व संशोधक विद्यार्थ्‍यांना देश-विदेशात प्रशिक्षणास पाठविले आहे. येत्या काळात अभियंते व जैवशास्त्रज्ञांना एकमेकांच्या विषयाचे ज्ञान अवगत करून एकत्र काम करावे लागेल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com