Fertigation Technique :: सर्व हायटेक ॲग्रीकल्चर, महत्त्वाची फळपिके आणि भाजीपाला पिकांत विद्राव्य खते देण्याचे (फर्टिगेशन) तंत्रज्ञान सर्वमान्य झाले आहे. तीस वर्षांपूर्वी फर्टिगेशनचे तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम आणण्यामध्ये मोलाची भूमिका निभावणाऱ्या डॉ. स्वप्नील बच्छाव यांनी ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शनासह पोहोचविण्यामध्येही अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
तीस वर्षांपूर्वी ड्रीप इरिगेशन अर्थात ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान नुकतेच मूळ धरू लागले होते. मात्र ठिबक सिंचनामधून केवळ पाणी देण्यापेक्षा पाण्याबरोबरच पिकांना आवश्यक ती अन्नद्रव्ये देण्यासंदर्भात विचारही पुढे आला. परदेशामध्ये हे तंत्रज्ञान बऱ्यापैकी रुजू लागले होते. असे नवे तंत्रज्ञान डॉ. स्वप्नील बच्छाव यांनी भारतामध्ये आणले. ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे व रुजविण्याचे आव्हान स्वीकारले. त्या वेळी ते ईपीसी इंडस्ट्रीज या ठिबक सिंचन क्षेत्रातील कंपनीत काम करत होते.
आपल्या देशामध्ये ठिबकद्वारे खते देण्याची संकल्पना आणि तंत्र नवे असले तरी अमेरिका, इस्राईल व युरोपीय देशांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला होता. या सर्व प्रगत देशांना भेटी देऊन तेथील तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. ही संकल्पना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या वेळी भारतामध्ये फर्टिगेशनबाबत केवळ कृषी विद्यापीठे तसेच संलग्न संस्थांमध्ये फारसे संशोधन व काम झालेले नव्हते. त्यामुळे विद्राव्य खतांच्या वापराबाबत फारच त्रोटक माहिती उपलब्ध होती.
भारतीय खत नियंत्रण कायद्यांतर्गत खतांची नोंदणी परवानग्या घेतल्या. विद्राव्य खतांचा पहिला कंटेनर १९९३ मध्ये भारतामध्ये आयात केला. या खतांच्या चाचण्या अनेक प्रगतिशील शेतकरी व कृषी विद्यापीठे यांच्या प्रक्षेत्रावर भारतातील महत्त्वाची व्यापारी पिकांवर घेतल्या. उदा. द्राक्षे, केळी, ऊस तसेच टोमॅटो, सिमला मिरची व अन्य भाजीपाला पिके इ. या बहुतांश सर्व पिकांवर विद्राव्य खतांच्या वापराचे चांगले निष्कर्ष मिळाले. या संशोधनांच्या निष्कर्षावर आधारित ‘फर्टिगेशन इन इंडिया - अ केस स्टडी’ असा अहवाल तयार केला. हा भारतातील पाण्यात विरघळणाऱ्या खताच्या वापरावरचा पहिला शास्त्रीय पेपर होता. तो डॉ. स्वप्नील बच्छाव यांनी इस्राईल येथील ‘इस्राईल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हायफा’ येथे २६ मार्च ते १ एप्रिल १९९५ दरम्यान झालेल्या जागतिक विज्ञान परिषदेमध्ये सादर केला. विद्राव्य खतांच्या या तंत्रज्ञानाबाबत आजपर्यंत त्यांनी भारतीय जर्नलमध्ये ३२ व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ४ शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत.
कृषी विस्तारात कार्यरत...
एका बाजूला शास्त्रीय जगतांमध्ये काम सुरू असताना शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी डॉ. बच्छाव यांचे प्रयत्न सुरूच होते. त्यांना आजवर ६०० पेक्षा जास्त शेतकरी मेळावे, परिसंवाद घेतले आहेत. शेतीविषयक मासिके व वृत्तपत्रे यामध्ये सातत्याने लेख लिहिले. आकाशवाणी, दूरदर्शन अशा माध्यमांतून अनेक वेळा मुलाखतीमधूनही ते लोकांपर्यंत पोहोचत राहिले. ‘ईपीसी इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून ही वाटचाल सुरू असताना ते त्या कंपनीचे ‘सीईओ’ झाले. मात्र कालांतराने कंपनी आर्थिक अडचणीमध्ये सापडली. कंपनीची फर्टिगेशन डिव्हिजन बंद करण्याचा निर्णय झाला. त्या वेळी जवळपास १३ वर्षे या कंपनीत काम केलेल्या व फर्टिगेशन डिव्हिजन नावारूपाला आणणाऱ्या डॉ. स्वप्नील बच्छाव यांनाच या अडचणीत आलेल्या कंपनीची पूर्ण जबाबदारी घेण्याविषयी विचारणा झाली. कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्याचा स्वभाव असलेल्या डॉ. स्वप्नील बच्छाव यांनी ही कंपनीची मालकी मिळवली. अशा प्रकारे कंपनीचा कर्मचारी ते कंपनीचा मालक असा प्रवास पूर्ण झाला.
नवी ओळख, नवी दिशा...
डॉ. बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीला नवी ओळख देण्यात आली. तिचे नाव झाले ‘रिचफिल्ड फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’. ठिबकद्वारे द्यावयाच्या विद्राव्य खतांसाठी ‘रिचफिल्ड’ हा ब्रँड, तर फवारणीद्वारे द्यावयाच्या खत उत्पादनासाठी ‘रिचस्प्रे’ हा ब्रँड निवडण्यात आला. या ब्रँडखाली दर्जेदार अशी खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाऊ लागली. कंपनी वेगवेगळी विद्राव्य खते, फवारणीद्वारे द्यावयाची खते, त्यातही चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये, स्पेशियालिटी लिक्विड खते व ऑरगॅनिक खते यांचा पुरवठा करते. महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त अन्य सुमारे १३ राज्यांमध्ये कंपनीचा आता विस्तार झाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी युरोपमधील अत्यंत नामांकित आणि प्रथितयश अशा कंपन्यांबरोबर कंपनीने करार केलेले आहेत. त्यामुळे जगातील उत्तमोत्तम, दर्जेदार उत्पादने भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहेत. अनेक शेतकऱ्यांनाही या खतांचा वापरामुळे उत्पादन आणि उत्पन्नामध्ये ६० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ मिळाल्याचा अनुभव आहे. पारंपरिक खतांच्या तुलनेने एकूण खत वापरामध्ये ३० ते ४० टक्के बचतही होत आहे.
शाश्वत सेंद्रिय उत्पादनासाठी...
१९६० नंतर भारतात हरितक्रांती यशस्वी झाली तरी पुढे रासायनिक खते व पाण्याच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा कस गेला. शेतकरी नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळू लागला. परिणामी, सेंद्रिय निविष्ठांची मागणी वाढू लागली. या शेतीमध्येही पिकांच्या योग्य पोषणासाठी सेंद्रिय खतांचा आवश्यकता होती. त्यातून पिकांचे योग्य पोषण आणि जमिनीचे आरोग्य जपणारी सेंद्रिय खते रिचफिल्ड फर्टिलायझर्सने बाजारात आणली. त्यामुळे शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला यांचे रेसिड्यू फ्री, सेंद्रिय उत्पादने घेण्यास मदत झाली.
दरम्यान मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये सिक्कीम हे सेंद्रिय राज्य घोषित केले. या राज्याला ‘सेंद्रिय राज्य’ करण्यामध्ये ‘रिचफिल्ड’ने आजवर सिक्कीमला पुरविलेल्या दर्जेदार सेंद्रिय निविष्ठांचा सिंहाचा वाटा आहे. रिचफिल्डच्या दर्जेदार सेंद्रिय उत्पादनांच्या साह्याने सिक्कीममधील शेतकरी सेंद्रिय उत्पादन घेऊन स्वतःची प्रगती करत आहेत.
पुरस्कार व सन्मान ः
फर्टिगेशनचे तंत्रज्ञान भारतामध्ये सर्वप्रथम आणणारी रिचफिल्ड फर्टिलायझर्स ही कंपनी आता नॅनो टेक्नॉलॉजी, बायो स्टिम्यूलंट व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये अशी एकापेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भारतातील ‘हायटेक ॲग्रिकल्चर’मध्ये परिवर्तन घडविण्याचे काम करीत आहे. दर्जा व गुणवत्ता याची सांगड घालणारी रिचफिल्ड व रिच स्प्रे या ब्रँडखाली उत्कृष्ट खते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहेत. त्यामुळे रिचफिल्ड फर्टिलायझर्स ही विद्राव्य खतांतील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. त्या मागे कार्यरत असलेल्या डॉ. स्वप्नील बच्छाव यांना फर्टिगेशन क्षेत्रातील योगदानाबद्दल शासन व सार्वजनिक स्तरावरील अनेक पुरस्कार व सन्मान मिळालेले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘उद्यान पंडित’, कै. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘कृषी शास्त्रज्ञ’ या सन्मानाने गौरविण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट’ व ‘प्लॅटिनम स्कॉच एव्हरग्रीन रिव्होल्यूशन ॲवॉर्ड’ या अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसोबतच ‘मराठा बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड’ आणि ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड’, दैनिक भास्कर ग्रुपचा ‘सन ऑफ सॉइल’ यांचाही समावेश आहे.
डॉ. स्वप्नील बच्छाव, ९४२२२४५८२९
चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर,
रिचफिल्ड फर्टिलायझर्स प्रा. लि., नाशिक.
मेल - mail@richfield-wsf.com
डॉ. उदय भोसले, ९४२२२५१५५९
प्रेसिडेंट - बिझनेस ऑपरेशन्स
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.