Akola Rising Temperature : अकोल्यात तापमान वाढ पिकांच्या मुळावर

Crop Damage : यंदा फेब्रुवारीत दिवसा तीव्र उष्णता आणि रात्री थंडीचा जोर, अशा विचित्र वातावरणाने उन्हाळी पिके, फळबागांना जसा फटका बसतो आहे, तसाच त्रास नागरिकांनाही सहन करावा लागत आहे.
Heat Stress Crop
Summer Heat Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Akola News : यंदा फेब्रुवारीत दिवसा तीव्र उष्णता आणि रात्री थंडीचा जोर, अशा विचित्र वातावरणाने उन्हाळी पिके, फळबागांना जसा फटका बसतो आहे, तसाच त्रास नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. गावागावात सर्दी, खोकला, तापेचे रुग्ण असून दवाखाने तुडूंब भरलेली दिसून येतात. विशेषतः लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो आहे.

Heat Stress Crop
Onion Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश

यंदा फेब्रुवारी सुरू होताच तापमान वाढीला सुरुवात झाली. मागील काही दिवसांत दिवसाचे तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान तर रात्रीचे तापमान १५ ते १९ दरम्यान राहत आहे.

Heat Stress Crop
Vegetable Crop Damage: भाजीपाला, फळ पिकांना उन्हाचा फटका

या तापमानाचा विपरीत परिणाम पिकांवर अधिक दिसून येत आहेत. या भागात कलिंगड, खरबूज लागवड अधिक झालेली आहे. या पिकांना सर्वाधिक फटका बसला.

आधीच कीड, रोगांचा प्रादुर्भाव झालेला होता. त्यात तापमान वाढीचा ताण बसतो आहे. पिकाला उष्णता-थंडीचे वातावरण मानवलेले नाही. अचानक कलिंगडाचे वेल वाळून जात आहेत. या पिकासाठी एकरी लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. हा लागवडीचा पैसाही अनेकांचा निघालेला नाही. उशिराने लागवड झालेल्या हरभरा पिकाची अवस्था अशीच होती. हरभऱ्याचे उत्पादन एकरी चार ते सहा क्विंटल दरम्यान बहुसंख्य शेतकऱ्यांना झाले आहे.

रात्री थंडी व दुपारी वाढलेल्या तापमानाचा कलिंगडाच्या प्लॉटवर मोठा परिणाम होत आहे. यंदा १५ एकरात लागवड केलेली आहे. सध्या जागेवरच १० रुपयांपर्यंत किलोचा दर मिळतो आहे. माझ्या शेतातील काही क्षेत्रातील मालाची आठवडाभरात तोडणी करावी लागणार आहे. अचानक वातावरणात असा विलक्षण बदल झाल्याने कलिंगडाचे वेल सुकत आहे. यामुळे उत्पादनाला मोठा फटका बसू शकतो.
- सचिन कोरडे, कलिंगड उत्पादक, हिंगणी, ता. तेल्हारा, जि. अकोला
यावर्षी उन्हाळा लवकर चालू झाला की काय असे वातावरण आहे. त्यामुळे भुईमूग, कलिंगड यासारख्या पिकांना फटका बसतो आहे. पिकाला ताण बसतो आहे. पाणी देण्यासाठी दिवसाला आठ तास वीज भेटते आहे. मात्र, दिवसा पाणी दिल्यामुळे पिकाला जैविक- अजैविक ताण बसत आहे. यामुळे पिकाला मॅच्युरिटी स्टेज लवकर आल्याचे दिसते. पिकाला लवकर फुले लागायला सुरुवात झाली असून यामुळे उत्पादनामध्ये घटीची शक्यता अधिक आहे.
- विनोद पाटील, सुदी, ता. मालेगाव, जि. वाशीम
तापमानात वाढ झाल्याने पिकांची पाण्याची गरज वाढली आहे. कांदा, लसूण या सारख्या पिकात अकाली परिपक्वता येऊ शकते. परिणामी उत्पादनाला फटका बसतो. मिरचीच्या पिकात फुलगळ होऊ शकते. भाजीपाला, फळबागवर्गीय यासाठी शिफारशीत उपाययोजना कराव्यात. तसेच पाण्याची कमतरता भासू देऊ नये. पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे राहते.
- प्रा. डॉ. विजय काळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com