Climate Change Impact : वाढत्या उष्णतेमुळे शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Agriculture Work : खानदेशात उष्णता सतत वाढत आहे. यामुळे शेतीकामांच्या वेळेत बदल केले जात आहेत. पिके रब्बी हंगामात जोमात उभी झाली आहेत. यातच शेतीकांनाही फटका बसत असून, शेतकरी सकाळी लवकर कामे उरकून घेत आहेत.
Heat Wave
Summer Heat Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात उष्णता सतत वाढत आहे. यामुळे शेतीकामांच्या वेळेत बदल केले जात आहेत. पिके रब्बी हंगामात जोमात उभी झाली आहेत. यातच शेतीकांनाही फटका बसत असून, शेतकरी सकाळी लवकर कामे उरकून घेत आहेत.

रब्बी हंगामात कापणी, मळणीची कामे सुरू आहेत. तसेच केळी लागवड, कलिंगड, पपईची काढणी, तणनियंत्रण, पिकात सिंचन आदी कामे सुरू आहेत. ही कामे हिवाळ्यात किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी शेतकरी दिवसभर आवरून घेत होते. परंतु मागील सात ते आठ दिवसात उष्णता सतत वाढली आहे.

Heat Wave
Heat Wave : मध्यप्रदेश सरकारने नैसर्गिक आपत्तीत केला उष्णतेच्या लाटेचा समावेश; मृतांच्या कुटूंबियांना मिळणार नुकसान भरपाई

सूर्य कोपला

मजूरटंचाई असतानाच सूर्यही कोपला आहे. सकाळी ११ पासून उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात होते. खानदेशात सध्या रोज ३७ ते ३८ अंश सेल्सिअस एवढे तापमान आहे. मध्यंतरी काही भागात ३६ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान होते. दुपारनंतर उष्ण झळा बसतात. याचाही फटका फळे, भाजीपाला पिकांना बसत आहे.

हलक्या जमिनीत अधिकची हानी उष्णतेने होऊ लागली असून, पाणी काटेकोरपणे व व्यवस्थितपणे द्यावे लागत आहे. कमाल शेतकरी बागायती पिकांसाठी ठिबकचा उपयोग करतात. जुनी ठिबक व्यवस्थित कार्यरत असावी, त्याचे बंद असलेले ड्रीप

सिंचनक्षम व्हावेत यासाठी शेतकरी ठिबकची स्वच्छता करून घेत आहेत. शेतीकामे उरकताना मोठ्या व अन्य शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. अनेक जण शेणखताची वाहतूक, मशागत, वाहतूक आदी कामे रात्री करून घेत आहेत. ही कामे सकाळीच अनेक जण करीत आहेत. रात्री मात्र गारठा असतो. विषम वातावरणाचा फटका पिकांना बसत आहे.

Heat Wave
Heat Wave: उन्हाचा चटका पुन्हा वाढला; राज्यातील कमाल तापमानाचा पार ३७ अंशाच्या पार पोचला

सकाळीच कामांना सुरुवात

रब्बी पिके पक्व होत असून, उन्हाळ पिके शेतात आहेत. त्यांची कापणी, काढणीचे काम सुरू आहे. उशिरा लागवडीचा कांदा, बाजरीचे पीक शेतात पक्व होत आहे. काही भागात मजूरटंचाई आहे. तर काही भागात अधिकची मजुरी देऊन मजूर आणावे लागत आहेत.

अशात मजूरमंडळी सकाळी लवकर कामे करीत आहेत. त्यात सकाळी सात ते दुपारी १२ या कालावधीत कामांची नवी वेळ अनेक भागात तयार झाली आहे. मजुरी दर मात्र स्थिर आहेत. त्यात पुरुषास २५० रुपये व महिलेस २०० रुपये रोज दिला जात आहे. काही भागात महिलांना १८० रुपये रोज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com