Air Pollution : हवेतील कार्बनचे वाढते प्रमाण चिंताजनक

Carbon Emission : वातावरणातील कार्बनडाय आक्साईडचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, २०२५ नंतर मानवावर मोठी आपत्ती येणार असल्याचा इशारा जागतिक स्तरावर संशोधन करणाऱ्या-या इंटरनॅशनल गव्हर्नमेंट पॅनेल ऑफ क्लायमेट चेंज या संस्थेतील शास्त्रज्ञांनी दिला आहे
Air Pollution
Air PollutionAgrowon
Published on
Updated on

Solapur News : वातावरणातील कार्बनडाय आक्साईडचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, २०२५ नंतर मानवावर मोठी आपत्ती येणार असल्याचा इशारा जागतिक स्तरावर संशोधन करणाऱ्या-या इंटरनॅशनल गव्हर्नमेंट पॅनेल ऑफ क्लायमेट चेंज या संस्थेतील शास्त्रज्ञांनी दिला आहे.

याकडे लक्ष वेधताना जीवसृष्टी वाचवायची असेल तर वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणारे, दगडी कोळशाइतकीच वीज निर्मितीसाठी उष्णता देणारे, इतर इंधनाच्या तुलनेत अतिशय कमी राख शिल्लक राहणाऱ्या-या बांबूची लागवड फायदेशीर ठरणार आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी त्याकडे वळावे, असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी येथे केले.

उत्तर सोलापूर तालुका पत्रकार संघ व उत्तर सोलापूर सरपंच समितीच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील गुणिजनांना पटेल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

Air Pollution
Air Pollution : धक्कादायक! प्रदूषित हवेने भारतात २१ लाख बळी, ५ वर्षाखालील मुलांची संख्या जास्त

राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार दिलीप माने, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजित पवार, ओ.बी.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पौळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गायकवाड, सरपंच समितीचे अध्यक्ष उमेश भगत, भाजपचे तालुका अध्यक्ष राम जाधव, वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्षा वृषाली पवार, माजी सभापती रजनी भडकुंबे, शेतकरी संघटनेचे नेते शिवानंद दरेकर यावेळी उपस्थित होते.

श्री. पटेल म्हणाले, की सोलापुरातील एनटीपीसीमध्ये मोठ्याप्रमाणात दगडी कोळसा जाळला जातो. परंतु वीज निर्मितीसाठी आता दगडी कोळशाऐवजी तेवढीच उष्णता देणाऱ्या-या व पर्यावरणाचे संतुलन राखणा-या बांबूचा उपयोग करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना-यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी. त्याकरिता पत्रकार आणि सरपंचांनी पुढाकार घ्यावा, शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे.``

Air Pollution
Delhi Air Pollution : हवेच्या गुणवत्तेवरील ‘अरण्यरुदन’

काका साठे म्हणाले, उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व नेतेमंडळींना एकत्रित करण्याचे काम पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून उत्तर सोलापूर पत्रकार संघ करीत असून, तालुक्यातील गुणीजनांचा सन्मान करण्याचा पत्रकारांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी स्वागत केले. सरपंच समितीचे अध्यक्ष उमेश भगत यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार दत्ता मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार सुदर्शन सुतार यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान...

प्रा.डॅा.किशोर शिंदे,पाकणी (कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल), सरस्वती पवार, अकोलेकाटी (प्राथमिक शिक्षणातील भरीव कामगिरी), अतिश शिरगिरे (पाणी फाउंडेशन), विजय थोरात (पत्रकारिता), वामन भोसले, कोंडी (उद्योग), कविता शिंदे (महिला व्यसायिक, प्लंबिंग ) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार मधुकर गिरी महाराज (नान्नज), पोलिस निरीक्षपदी निवड झालेले रोहित माने, तळेहिप्परगा, भारतीय सैन्यात अग्नीवर म्हणून निवड झालेले रोहन इनामदार (मार्डी), ग्रामविकास अधिकारी ज्योती बिराजदार, बीबीदारफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पूजा खराडे व माजी आमदार दिलीप माने यांचे स्वीयसहायक शिवाजी घोडके पाटील यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com