SRT Technique : ‘एसआरटी’ तंत्रज्ञानामुळे भात पट्ट्यात क्रांती

Paddy Farming : ‘एसआरटी’ भात लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन यातून शेतकरी घेत आहेत.
Paddy Farming
Paddy Farming Agrowon
Published on
Updated on

Nashik News : ‘एसआरटी’ भात लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन यातून शेतकरी घेत आहेत. यातून उत्पादन दुपटीने वाढते, जमीन सुपीक होते, तसेच गांडूळाचे प्रमाणही वाढते.

नाशिक जिल्ह्यातील भात उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांनी या माध्यमातून क्रांती केली आहे. त्यामुळे जास्तीतजास्त भात उत्पादकांनी या पद्धतीचा अवलंब करावा,असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले.

इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील कचरू पाटील-शिंदे व मुकणे परिसरातील शेतकऱ्यांनी आत्मा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खरीप हंगामात सगुणा भातलागवड केली आहे. भरघोस उत्पादन देणाऱ्या सगुणा भातलागवड यशस्वी प्रयोगाची पाहणी ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. ‘आत्मा’अंतर्गत जिल्हास्तरीय शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, सदस्य विष्णुपंत गायखे, चंद्रभान कोंबडे आदींनी या शेतीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.

Paddy Farming
SRT Agriculture: एसआरटी तंत्रज्ञानात महत्त्व माहित आहे का?

निकम म्हणाले, की पारंपरिक भातलागवड पद्धतील नांगरणी, चिखलणी, भाताच्या रोपांचे वाफे तयार करणे आणि नंतर मजुरांना घेऊन लावणी करणे अशा पद्धतीचा अवलंब केला जातो. यात श्रम, वेळ आणि खर्च अधिक असतो.

परंतु ‘एसआरटी’ लागवड पद्धतीत नांगरणी, चिखलणी लावणी न करता गादी वाफ्यांवर टोकपणी करून लागवड केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाचतोच पण उत्पादन वाढण्यास मदत होते. यासह जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीचा कर्ब वाढतो आणि उत्पादकताही वाढते.

Paddy Farming
SRT Technology : ‘एसआरटी’ने २९ हजार हेक्टरवर होणार भात लागवड

प्रत्येक तालुक्यात ‘आत्मा’च्या माध्यमातून १०० एकर क्षेत्रावर हा प्रयोग यंदा घेण्यात आला होता असे, निकम यांनी सांगितले. शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. राज्याबाहेर शेतकऱ्यांसाठी सहलीचे आयोजन लवकर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मुकणे येथील प्रयोगशील शेतकरी कचरू पाटील-शिंदे यांनी गांडूळ खतांच्या माध्यमातून सगुणा भातलागवड केली आहे. ते ही शेती चार वर्षांपासून करीत आहेत. सध्या पीक दमदार आहे. ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे, कृषी सहायक कोकाटे, भालेराव, एसआरटी सेवक विष्णू कचरू पाटील-शिंदे, बाजीराव नाठे, शेतकरी समाधान राव, योगेश राव, खंडू वेल्हाळ आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com