
Pune News : वीजदरात चार वर्षांत झालेल्या भरमसाट वाढीमुळे शीतगृहांच्या अर्थकारणावर परिणाम होत आहे. शीतगृहांना आकारण्यात आलेली ही वाढीव वीजदर मागे घेतली जावी, अशी मागणी महाराष्ट्र कोल्ड स्टोअरेज असोसिएशनच्या नवव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे अध्यक्ष राजकिशोर केंढे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या वेळी भरमसाट वीजदर मागे घ्यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली. सभेस उपाध्यक्ष पुरुषोत्तम नावंदर, बिपिन रेवणकर, आदित्य झुनझुनवाला, सचिव तुषार पारख, खजिनदार प्रतीक मेहता, सहखजिनदार अनिल कोरपे, सदस्य प्रदीप मोहिते, सागर काबरा यांच्यासह पुणे, नगर, नागपूर, धुळे, कराड, सातारा, अकोला, गोंदिया, नांदेड, मालेगाव, नाशिक, जळगाव, जालना, नंदुरबार, परभणी आदी सर्व जिल्ह्यांतील सभासद या वेळी उपस्थित होते. या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्रे झाली आणि अभ्यास दौराही आयोजिण्यात आला होता.
सभेत शीतगृह उद्योगाला येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींवर चर्चा झाली. शीतगृहांसाठीच्या विजेच्या दरात महावितरणने चार वर्षांत भरमसाट वाढ केल्याने शीतगृह उद्योगाच्या अर्थकारणावर होत असल्याबद्दल राजकिशोर केंढे यांनी व्यक्त चिंता व्यक्त केली. याप्रसंगी संघटनेच्या काही सदस्यांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून चुकीच्या पद्धतीने ग्रीनऐवजी ऑरेंज कॅटेगिरीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे, त्यामुळे ते त्रस्त आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष श्री. नावंदर यांनी दिली. या वेळी वीजदर मागे घेण्यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आली.
माथाडी कामगार विधेयक व कृषी पणन विधेयकात केलेल्या सूचना शीतगृह उद्योगासाठी अडचण निर्माण करणाऱ्या ठरतील, अशी भीती रेवणकर व कोरपे यांनी व्यक्त केली. ब्ल्यू कोड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रेम सखुजा यांनी अमोनिया व फ्रीऑन रेफ्रिजरेंट वापरून शीतगृह उभारण्याचे फायदे व तोटे सांगितले.
रेफ्रिजरेशन प्रणालीत ऑईल व पाण्यामुळे कार्यक्षमता कमी होते. ते टाळण्यासाठीच्या उपायांबद्दल माणिक इंजिनिअरचे आनंद जोशी व फ्लुईड्स टेक्नॉलॉजीचे संचालक आशिष कदम यांनी माहिती दिली. एलिमेंट्स पफ पॅनेलचे राहुल धूत यांनी पफ इन्सुलिटेड पॅनेलवर माहिती दिली. कोल्ड स्टोअरेज प्लांटमधील सुरक्षिततेवर उपाध्यक्ष झुनझुनवाला यांनी माहिती दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.