Jiwant Satbara Mohim : ‘जिवंत सातबारा’ मोहिमेला प्रतिसाद, ठाणे जिल्ह्यातील ७ तालुक्यात उपक्रम

Thane Rivenue Department : सातबाऱ्यांवरील मृत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया राबवून सर्व नोंदी घेऊन सातबारा जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी महसूल विभागाने जिवंत सातबारा मोहीम हाती घेतली आहे.
Jiwant Satbara Mohim
Jiwant Satbara Mohimagrowon
Published on
Updated on

Thane Farmers : सातबाऱ्यांवरील मृत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया राबवून सर्व नोंदी घेऊन सातबारा जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी महसूल विभागाने जिवंत सातबारा मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यातील १००१ गावांमध्ये १२ हजार मयत खातेदार आढळून आले असून त्यापैकी १ हजार ३५६ मयत खातेदारांच्या वारसांनी ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज दाखल केले आहे. त्यापैकी ५७१ प्रकरणे मंजूर केली असून सातबाऱ्यावर त्यांच्या नावांची नोंद केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सातबाऱ्यावरील मृतांच्या नावांमुळे अनेकांना खरेदी-विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणांसह अनेक अडचणी येतात. सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूल विभागाच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत १ एप्रिलपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Jiwant Satbara Mohim
Thane Tribal Protest : जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांची धडक

ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १० मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारे अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात देखील जिवंत सातबारे ही मोहीम महसूल विभागाकडून हाती घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिवंत सातबारा अद्ययावत सातबारा करण्यासाठी महसूल प्रशासन गावोगावी भेटी देत आहेत. तसेच तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांनी गाव भेटी चावडी वाचन करून मोहीम विशेष मेहनत घेत मोहीम राबवत आहे.

तालुकानिहाय प्रस्ताव

तालुके शेतकरी खातेदार वारसनोंद

ठाणे, मीरा-भाईंदर ५,६६७ ९६९ १९२

कल्याण १७,३८१ १,६८४ १४०

मुरबाड ३८,४६७ २,९६८ १६७

भिवंडी २९,८४२ ३,१५७ ६००

शहापूर ३४,७०४ २,७९० २५६

उल्हासनगर ०० १४ ००

अंबरनाथ १२, ८०१ ८९५ ०१

ई-हक्क प्रणालीद्वारे नोंद

ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये १००१ गावांतील २५८ तलाठी सजा असून त्यामध्ये १ लाख ३८ हजार ८६२ शेतकरी खातेदार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याणमध्ये या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार ४७७ मयत खातेदार असल्याची माहिती मोहिमेंतर्गत समोर आली असून त्यापैकी १ हजार ३५६ मयत खातेदारांच्या वारसांनी ई हक्क प्रणालीद्वारे वारसनोंद करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com