
Pune News: लोक सहभागातूनच ग्रामस्थ, नागरिक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध तहसीलदार डॉ. सुनील शेळके महाराष्ट्र शासन महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे तसेच तहसील कार्यालय जुन्नर व ग्रामपंचायत राजुरी आणि समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिवंत सातबारा मोहीम राजुरी (ता. जुन्नर) या ठिकाणी राबविण्यात आली होती. त्या प्रसंगी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या प्रसंगी माजी सभापती दीपक औटी, राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माउली शेळके, वल्लभ शेळके, अजय कणसे, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी घंगाळे, शाकीर चौगुले, सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, अशोक औटी, ज्ञानेश्वर गटकळ, मोहन नाईकवाडी, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश औटी, उपाध्यक्ष दिलीप घंगाळे, गणेश हाडवळे, बेल्हे परिमंडळ अधिकारी दीपक मडके, तलाठी धनाजी भोसले, ग्रामविकास अधिकारी संदीप ढोरे, कोतवाल सचिन औटी तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी तहसीलदार डॉ. शेळके म्हणाले, की महसूल विभाग १०० दिवस कृती कार्यक्रम आराखडांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व खातेदारांच्या वारसाच्या नोंद अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राजुरी गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी), नवीन मतदार नाव नोंदणी, रेशनिंग कार्डावरील नावे कमी करणे व वाढविणे यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
दरम्यान, या वेळी जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत ६० कुटुंबांच्या सातबारावर वारस नोंदीचे अर्ज भरून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले. ४० शेतकऱ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शेतकरी ओळखपत्र काढण्यात आले. ५० नवीन मतदारांची नोंदणी अर्ज स्वीकारून पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. १२५ कुटुंबांचे रेशन कार्डामध्ये नाव कमी व वाढवणे या बाबतचे नोंदणी अर्ज भरून घेण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गाडेकर यांनी केले. तर सरपंच प्रिया हाडवळे यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.