Dahigaon Irrigation Scheme : दहिगाव सिंचन योजनेची उंची ४८५ मीटर करा

Agriculture Irrigation : करमाळा तालुक्यातील पूर्व भागाची वरदायिनी दहिगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित झालेली असून, २२ गावांतील १० हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Solapur News : तालुक्याला पुरेसे हक्काचे पाणी मिळण्यासाठी दहिगाव उपसा सिंचन योजनेची पाणी उचलण्याची पाणी पातळीची उंची ४८५ मीटर करण्यात यावी, असा ठराव आमसभेत आमदार नारायण पाटील यांनी मांडला व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शुक्रवारी (ता. ३०) धर्मसंगीत मंगल कार्यालयात आयोजित आमसभेत आमदार पाटील बोलत होते. यावेळी तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, पोलिस निरीक्षक रणजित माने, माजी सभापती गहिनीनाथ ननावरे, माजी सभापती अतुल पाटील, शेखर गाडे, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक राजेंद्रसिंहराजे भोसले, ‘आदिनाथ’चे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सविताराजे भोसले, ॲड. राहुल सावंत, राणा वाघमारे, अतुल खुपसे, बिभीषण आवटे, दादासाहेब पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती संजय जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Agriculture Irrigation
Arunavati Irrigation Project : अरुणावती प्रकल्प केव्हा गाठणार पूर्ण क्षमतेचा पल्ला

आमदार पाटील म्हणाले, करमाळा तालुक्यातील पूर्व भागाची वरदायिनी दहिगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित झालेली असून, २२ गावांतील १० हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. परंतु उजनी येथील पंपगृहाची पाणी उचलण्याची पाणी पातळीची उंची ४९० मीटर आहे. करमाळा तालुक्याला हक्काचे पाणी मिळत नाही.

Agriculture Irrigation
Irrigation Schemes : उपसा सिंचन योजनांतून २२ टीएमसी पाण्याचा उपसा

भीमा-सीना बोगदा ४८८.२० मीटर, मराठवाड्यासाठी जाणाऱ्या बोगद्याची उंची ४८७ मीटर आहे. या योजनेची पाणी उचलण्याची पातळी दहिगाव उपसा सिंचन योजनेपेक्षा खाली असल्याने दहिगाव योजना लवकर बंद होते. करमाळा तालुक्याला हक्काचे पुरेसे पाणी मिळण्यासाठी दहिगाव उपसा सिंचन योजनेची पाणी उचलण्याची पाणी पातळी उंची ४८५ मीटर करणे गरजेचे आहे. या सभेचे सुनील तळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचा ठराव मंजूर

पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता निहाल शेख, कनिष्ठ अभियंता बी. डी. वायकर, कनिष्ठ अभियंता जी. बी. खत्री यांना लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे सभेत त्यांच्या विरोधात सूर दिसून आला. आमसभेत या अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com