
Yavatmal News : औद्योगिकीकरणाच्या अभावी शेती हेच दिग्रस तालुक्यात उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. मात्र अशा स्थितीत या भागाला ‘सुजलाम् सुफलाम’ करण्यासाठी उभारलेल्या अरुणावती प्रकल्पातूनही पूर्ण क्षमतेने सिंचन होत नसल्याचे धक्कादायक वास्तव असून त्याचा परिणाम उत्पादकतेवर होत आहे.
४५ वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर अरुणावती प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर या प्रकल्पाची उभारणी देखील गतीने झाली. ३०० कोटी २५ लाख रुपयांचा खर्च या प्रकल्पाच्या उभारणीवर झाला. मात्र अपेक्षित सिंचन होत नसल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न पूर्णत्वास जाऊ शकले नाही.
या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदावरी खोऱ्यातील महत्त्वाची म्हणून अरुणावती नदीला ओळखले जाते. याच नदीवर १९७८ मध्ये दिग्रस तालुक्यातील सावंगा (बु.) या गावाजवळ शासनाने प्रकल्प उभारणीस मान्यता दिली. चिरकुटास तब्बल ११ गावांचे १३ ठिकाणी पुनर्वसन करून पाटबंधारे विभागाने हा प्रकल्प पूर्णत्वास नेला.
या प्रकल्पाची जलोत्सारणासह एकूण लांबी चार हजार ८६० मीटर असून, जलत्सोरणाची लांबी १६२ हजार मीटर आहे. या प्रकल्पाला १२ बाय आठ मीटरचे ११ वक्र दरवाजे असून, उजव्या तीरावर सिंचन वमोचक्र तर डाव्या तीरावर वमोचक्र व विद्युत विमोचक्र आहे. प्रकल्पाचा डावा मुरण्या कालवा ५५८० किलोमीटरचा तर उजवा कालवा ४६.२० किमीचा आहे. या प्रकल्पातून दिग्रस तालुक्यासह आर्णी, घाटंजी तालुक्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट होते.
एकीकडे प्रकल्पाचे व्रुवस्थापन, धरण साठवा, कालवे, वितरण प्रणालीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेल्याचा दावा केला जात असताना सिंचनाचे अपेक्षीत उद्दिष्ट मात्र या प्रकल्पातून गाठता आले नाही. पाण्याचा नियोजनबद्ध वापर होण्याच्या उद्देशाने अनेक पाणी वापर संस्थांची या प्रकल्पाअंतर्गत बांधणी केली आहे.
परंतु कालव्याचे अद्यापही अस्तरीकरण न झाल्याने शेवटच्या टेलपर्यंत पाणी पोहोचले नाही. या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा आर्णी तालुक्याला झाला आहे. प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या अशा कालव्याची सिंचन क्षमता कागदोपत्री २४००३ हेक्टर आहे. परंतु गत दहा वर्षांच्या कालावधीत अनेकदा १०० टक्के जलसाठा असताना सिंचन क्षमता १७,५०० हेक्टरवर पोहचू शकली.
कालव्यात झुडपे
अरुणावती प्रकल्पाच्या कालव्यात काटेरी झाडाझुडपांची साम्राज्य वाढले आहे. त्यासोबतच अनेक ठिकाणी भगदाडे पडल्याने त्यातूनही पाण्याचा अपव्यय होतो. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होते. त्याबाबतच्या तक्रारी दुर्लक्षित केल्या जॲातात, असा आरोप आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.