Cotton Soybean Subsidy : अर्थसाह्य योजनेच्या मुद्यावरून कृषी सहायक संघटनेत (ना)राजीनामे

Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना अर्थसाह्य देण्यासाठी असलेल्या योजनेची जबाबदारी कृषी सहायकांवर निश्‍चित करण्यात आली आहे.
Soybean and Cotton
Soybean and CottonAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : कापूस, सोयाबीन उत्पादकांना अर्थसाह्य देण्यासाठी असलेल्या योजनेची जबाबदारी कृषी सहायकांवर निश्‍चित करण्यात आली आहे. परंतु संगणकासह इतर कोणतीच सुविधा नसल्याने हे काम करण्यास कृषी सहायक संघटनेने नकार दिला होता.

आता याच मुद्द्यावर संघटनेत दुफळी निर्माण झाल्याचे वृत्त असून, अनेकांनी संघटनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्‍त करीत राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप केवटे यांनी मात्र हा केवळ सदस्यांमधील विसंवाद असल्याचे सांगितले.

गेल्या हंगामात सोयबीन, कपाशीची घटलेली उत्पादकता, बाजारात विक्री अंती मिळालेला कमी दर या पार्श्‍वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला.

प्रति हेक्‍टर ५००० रुपयांप्रमाणे दोन हेक्‍टरच्या मर्यादेत हे अर्थसाह्य केले जाणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना आधार कार्डची झेरॉक्‍स तसेच संमतिपत्र कृषी सहाय्यकाकडे जमा करावे लागणार आहे. कृषी सहायकांनी शेतकऱ्यांकडील दस्तऐवज व माहिती ऑनलाइन अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी कार्यपद्धती निश्‍चित केली आहे.

Soybean and Cotton
Cotton Subsidy : तेलंगणाच्या धर्तीवर कापसाला अनुदान देणार

या कामासाठी कृषी सहायकांना प्रति शेतकरी दहा रुपये परतावा मिळणार आहे. मात्र दहा रुपये ही रक्‍कम तोकडी असून ती २० रुपये असावी. त्यासोबतच ऑनलाइन कामासाठी संगणकाची सोय असावी, अशी मागणी होती. यांसह इतर काही मुद्यांवरून कृषी सहायकांनी या कामावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे शुक्रवारी (ता. १६) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कृषी आयुक्‍तांनी चर्चेसाठी पाचारण केले होते.

या वेळी संयुक्‍त खात्याच्या संदर्भाने शासनाचे मार्गदर्शन मागणे, त्यासोबतच प्रति शेतकरी नोंदीसाठीच्या रकमेत वाढीबाबत विचार करणे अशा मागण्यांवर सहमती झाली. त्यानंतर हे काम करण्यास संघटनात्मक स्तरावर सहमती झाली. परंतु राज्यातील सर्वच कृषी सहायकांना याबाबत विचारात घेण्यात आले नाही, असा आरोप करीत संघटनेच्या व्हॉट्‍सॲप ग्रुपवर या विषयी तीव्र प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

Soybean and Cotton
Cotton Subsidy: एका शेतकऱ्याला कापसासाठी जास्तीत जास्त किती मदत मिळू शकते?

अनेकांनी संघटनेच्या या भूमिकेचा निषेध करीत थेट व्हॉट्‍सॲप ग्रुपवरच राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. मुख्य मागण्यांची पूर्तता न होताच संघटनेने माघार घेणे चुकीचे असून, प्रति शेतकरी नोंदणीसाठी दहा रुपये हे तोकडे असल्याचा आरोप करण्यात आला.

अमरावती विभागीय सचिव प्रवीण ठाकरे, राज्य सचिव सोमनाथ बाचकर तसेच अध्यक्ष म्हणून मी असे कृषी आयुक्‍तांना भेटलो. या वेळी कृषी आयुक्‍तांनी संघटनेच्या अनेक मागण्यांच्या पूर्ततेबाबत सहमती दर्शविली. छत्रपती संभाजी नगरमध्ये संयुक्‍त खातेदारांपैकी कोणाच्या खात्यात पैसे जमा करावे या मुद्द्यावरून एका कृषी सहायकांवर हल्ला झाला होता. परिणामी, संयुक्‍त खाते प्रकरणात शासनाकडून मार्गदर्शन मागविले जाणार असल्याचे कृषी आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच कृषी सहायकांना न्याय्य मिळावा याकरिता आंदोलन मागे घेण्यावर एकमत झाले. संघटनेत कोणतीच नाराजी नसून केवळ विसंवाद आहे. विशेष म्हणजे या कामासाठी पहिल्यांदाच कृषी सहायकांना आकस्मिक निधी थेट मिळणार आहे.
- संदीप केवटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना,
ऑनलाइन कामाकरिता प्रति शेतकरी नोंदणी शुल्काऐवजी लॅपटॉपची उपलब्धता व्हावी अशी मागणी कृषी आयुक्‍तांकडील बैठकीत करण्यात आली.
- प्रवीण ठाकरे विभागीय सचिव, अमरावती विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com