Shasan Aplya Dari : धान्य महोत्सवातील नुकसानग्रस्त भरपाईसाठी वारंवार शासनाच्या दारी

Agriculture Department Festival : जळगाव शहरात कृषी विभागातर्फे आयोजित धान्य महोत्सव प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अपयशी ठरला. पावसाने या महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांचे धान्य व इतर बाबींची मोठी हानी झाली
Grain Festival
Grain FestivalAgrowon

Jalgaon News : जळगाव शहरात कृषी विभागातर्फे आयोजित धान्य महोत्सव प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अपयशी ठरला. पावसाने या महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांचे धान्य व इतर बाबींची मोठी हानी झाली. परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नसल्याची स्थिती आहे.

शासन आपल्या दारीचा मोठा गाजावाजा सुरू आहे. एकाच छताखाली अनेक योजनांच्या लाभार्थींना अनुदानावरील अवजारे व इतर बाबी दिल्या जात आहेत.

परंतु कृषी महोत्सवातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी किंवा भरपाईसाठी वारंवार शासनाच्या दारात जावे लागत आहे. पण सुस्त झालेला कृषी विभाग शेतकऱ्यांची दखल घ्यायला तयार नाही. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर २८ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या काळात गारपीट, वादळी पावसाची शक्यता शासनाच्या यंत्रणा, हवामान विभागाने व्यक्त केली होती. ही बाब लक्षात घेऊन हा महोत्सव स्थगित करण्याची गरज होती. परंतु कृषी विभागाने मनमानी करून महोत्सव आयोजित केला.

Grain Festival
Baramati Grain Festival : बारामती येथे ७ ते ९ एप्रिलदरम्यान धान्य महोत्सव

मोठा निधी त्यावर खर्च झाला. टेंट, मंडप, स्टॉल लावण्यात आले. परंतु २९ एप्रिल रोजी जोरदार वादळी पाऊस झाला. महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांनी या वादळातून आपला जीव कसाबसा वाचविला. मंडप कोसळला. शेतकऱ्यांनी या महोत्सवात विक्रीसाठी आणलेले धान्य, महिला बचत गटांच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचे मोठे नुकसान झाले.

महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांसंबंधी विमा संरक्षण घेतल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला होता. परंतु सहभागी शेतकऱ्यांचे धान्य खराब होऊन किंवा मोठे नुकसान होवूनही त्यांना भरपाई मिळालेली नाही.

विमा कंपनी मुजोरी करीत आहे. शेतकऱ्यांनी आपले खराब झालेले धान्य दाखवावे, असा फतवा मध्यंतरी विमा कंपनीच्या संबंधितांनी जारी केला होता. खराब झालेले धान्य शेतकरी कोठून आणतील, असा प्रश्न महोत्सवात सहभागी शेतकरी उपस्थित करीत होते.

शेतकऱ्यांनी भरपाईची वारंवार मागणी केली, पण त्याची दखल कृषी विभागाने घेतलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com