Crop Loan Recovery : शेतकऱ्यांच्या बचत खात्यांवरील निर्बंध उठवा

Drought Condition : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानवत, कोल्हा महसूल मंडलात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.
Farmers Issue
Farmers Issue Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यात यंदा दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आलेली असताना मानवत येथील भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) शाखेने पीककर्जाची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बचत व चालू खात्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बचत खात्यातून पैसे काढता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

त्यामुळे बँक खात्यावरील निर्बंध (होल्ड) उठवावेत, अशी मागणी कोथाळा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याकडे केली. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानवत, कोल्हा महसूल मंडलात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार या मंडलामध्ये शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती ही सवलत लागू करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे.

Farmers Issue
Crop Loan Recovery : दुष्काळग्रस्त भागात पीक कर्ज वसुली थांबणार

या सवलतीचा लाभ या मंडलातील शेतकऱ्यांना मिळायला हवा. परंतु भारतीय स्टेट बँकेच्या मानवत शाखेकडून पीककर्ज भरू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचत व चालू खात्यावर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे खात्यावरील जमा रक्कम काढता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी येत आहेत.

Farmers Issue
Crop Loan Recovery : पीक कर्जात व्याज वसुलीचा आग्रह नको

शासनाने पीक नुकसानीबद्दल दिलेली अर्थसाह्यता रक्कम, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतची मजुरीची रक्कम खात्यातून काढता येत नाही. दुष्काळी स्थितीत होरपळेलेले शेतकरी, मजुरांना दैनंदिन गरजांची पूर्तता करणे कठीण झाले आहे.

बँक खात्यावरील निर्बंध (होल्ड) उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोथाळा येथील वृषीसेन पाते, मारुती फाटे, देविदास पाते, परशुराम पाते, उत्तम गोरे, रघुनाथ सिद्धनाथ, राहुल सम्रतकर, कृष्ण पाते, सोमत्र फाटे आदी शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com