Cotton Import Duty: कापूस आयातीवरील ११% शुल्क रद्द करा; ‘सीओसीपीसी’ची केंद्राला शिफारस

COCPC Recommendations: भारतातील कापड उद्योग आणि अमेरिकेचा दबाव लक्षात घेता ‘कापूस उत्पादन आणि वापर समिती’ने (COCPC) कापूस आयातीवरील ११% शुल्क रद्द करण्याची केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Pune News: अमेरिकेच्या कापसासाठी देशातील बाजारपेठेची दारे सरसकट खुली करण्याची मागणी देशातील उद्योग करत आहेत. कापूस उत्पादन आणि वापर समितीनेही कापसावरील ११ टक्के आयात शुल्क कमी करण्याची शिफारस केली आहे. कापसावरील आयात शुल्क शून्य करून अमेरिकेला खुश करता येईल, असेही या समितीचे म्हणणे आहे.

कापूस उत्पादन आणि वापर समितीची अर्थात ‘सीओसीपीसी’ची बुधवारी (ता. १६) मुंबईत बैठक झाली. वस्त्रोद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरकारला काही शिफारशी करण्यात आल्या. सीओसीपीसीच्या सदस्यांमध्ये कापूस उद्योगातील सर्व भागीदारांचा समावेश आहे.

Cotton
Cotton Production: विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना टेक्स्टटाईल पार्कचा फायदा; मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा

देशातील कापूस उत्पादनात यंदा मोठी घट झाली. कापूस वापरापेक्षा यंदा उत्पादन कमी आहे. उत्पादन कमी राहिले तरी शेतकऱ्यांना कापसासाठी योग्य दर मिळाला नाही. कमी दर मिळाल्याने शेतकरी आडचणीत आले आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव कमी असल्याने हा कापूस देशात आयात करावा, यासाठी उद्योग प्रयत्न करत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस स्वस्त आहे. देशात कापसाचे भाव जास्त आहेत. त्यामुळे देशातील उद्योगांचा खर्च वाढत आहे. परिणामी सूत आणि कापड निर्यातीमध्ये अडचणी येत आहेत, असे कापड उद्योग म्हणणे आहे.

Cotton
Cotton Arrival: खानदेशात कापसाच्या आवकेत घट

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्वस्त कापूस देशात यावा यासाठी उद्योग प्रयत्न करत आहेत. मागील महिन्यातच उद्योगांनी अमेरिकेच्या १५ ते २० लाख गाठी कापसाची शुल्कमुक्त आयात करावी, अशी मागणी केली होती. आता सीओसीपीसीने सरकारला ११ टक्के आयात शुल्क काढण्याची मागणी केली. सरकार सरसकट आयात शुल्क काढू शकत नसेल तर सरकारने एक महिन्यासाठी आयात शुल्काला स्थगिती द्यावी, अशीही शिफारस सीओसीपीसीने केली आहे.

अमेरिकेला खुश करण्याचा प्रयत्न

अमेरिकेच्या कापसाला भारताने बाजारपेठ खुली करून द्यावी, अशी मागणी अमेरिका भारताकडे करत आहे. केंद्राने कापूस आयातीवर ११ टक्के शुल्क आधीच लावलेले आहे. अमेरिका हे शुल्क काढण्याची मागणी करत आहे. आता देशातील उद्योगही केंद्राने आयात शुल्क काढण्याची मागणी करत आहेत. अमेरिकेने भारताच्या आयातीवर शुल्क लावले आहे. भारताने कापसावरील आयात शुल्क काढल्यास अमेरिकेला सकारात्मक संदेश जाईल, असेही उद्योगांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com