Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी आशिष मिश्राला दिलासा

Farmer's Protest Delhi : शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी आशिष मिश्रा याच्या अटकपूर्व जामिनाची मुदत सर्वोच्च न्यायालयाने वाढवल्याने त्याला सोमवारी (ता.१२) दिलासा मिळाला आहे.
Lakhimpur Kheri Violence
Lakhimpur Kheri ViolenceAgrowon

Delhi News : शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी आशिष मिश्रा याच्या अटकपूर्व जामिनाची मुदत सर्वोच्च न्यायालयाने वाढवल्याने त्याला सोमवारी (ता.१२) दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के.व्ही.विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून, मिश्राच्या अटकपूर्व जामिनाची मुदत पुढील आदेशापर्यंत वाढवली आहे.

देशात शेतकरी आंदोलन सुरू असताना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी अजय मिश्रा याच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती. ज्यामध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये लखीमपूर खेरीतील तिकोनियामध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर आरोप निश्चित करण्यात आला.

Lakhimpur Kheri Violence
Delhi Farmers Protest : दिल्ली आंदोलनावर शेतकरी ठाम ; शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारची धावाधाव

सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा याच्या अटकपूर्व जामिनाला पुढील सुनावणीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मिश्रा याच्यासह १४ जणांवर हा आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणी मिश्रासह अंकित दास, नंदन सिंह बिश्त, लतीफ काले, सत्यम उर्फ सत्य प्रकाश त्रिपाठी, शेखर भारती, सुमीत जायस्वाल, आशिष पांडे, लवकुश राणा, शिशुपाल, उल्हास कुमार ऊर्फ मोहित त्रिवेदी, रिंकू राणा, वीरेंद्र शुक्ला, धर्मेंद्र बंजारा यांच्यावर हा आरोप निश्चित करण्यात आला आहे.

Lakhimpur Kheri Violence
Delhi Farmer's Protest : शेतकऱ्यांचा आजपासून ‘चलो दिल्ली’चा एल्गार

एसआयटीकडून आरोपपत्र दाखल

या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम १४७, १४८, १४९, ३०२, ३०७, ३२६, ४२७ आणि १२० तसेच मोटर वाहन अधिनियम कलम १७७ अन्वये आरोप निश्चिती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा ‘टेनी’ यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याच्या डझनभर साथीदारांवर चार शेतकऱ्यांना जीपने चिरडून त्यांच्यावर गोळीबार केल्याचा गंभीर आरोप आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष मिश्रा, त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने ५००० पानी आरोपपत्र दाखल केले असून ही घटना सुनियोजित कट असल्याचे एसआयटीने म्हटले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com