Agriculture Minister Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा; न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती

Court Stay : जिल्हा न्यायालयाच्या निकाला आव्हान देण्यासाठी कृषिमंत्र्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला आहे.
Agriculture Minister Manikrao Kokate
Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
Published on
Updated on

Maharashtra Politics: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. सरकारी सदनिकाचा लाभ मिळवण्यासाठी कागदांची फेरफार केल्या प्रकरणी कोकटे यांना २ वर्षाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली होती. परंतु जिल्हा न्यायालयाच्या निकाला आव्हान देण्यासाठी कृषिमंत्र्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला आहे.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सदानिका प्रकरणात गोत्यात आले आहेत. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधु विजय कोकाटे यांनी अर्थिक उत्पन्न कमी असल्याचं दाखवत मुख्यमंत्री कोट्यातून १९९५ साली सरकारी सदनिका लाटल्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठवली आहे.

त्यामुळे विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सलग दुसरे कृषिमंत्री गोत्यात आल्याने महायुती सरकारची कोंडी झाली आहे. नाशिक शहरात माणिकराव कोकाटे यांनी ३० वर्षापूर्वी कमी उत्पन्न गटातून सरकारी सदनिका मिळवली.

Agriculture Minister Manikrao Kokate
Jaykumar gore : मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेला पाठवले नग्न फोटो; संजय राऊत यांचा आरोप

त्यावेळी त्यांचे बंधू विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चौघांनी कॅनडा कॉर्नर भागात व्ह्यू अपार्टमेंटमध्ये चर सदानिका मिळवल्या. परंतु तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली. या तक्रारीवरुन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सदनिका वाटपाची चौकशी केली. तसेच गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा ३० वर्षांनंतर नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. या निकालात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना २ वर्षांचा कारावास आणि ५० हजारांची दंडाची शिक्षा सुनवण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com