Seena River : सीना नदीसह कुरुल कॅनॉलमध्ये पाणी सोडा

सध्या तीव्र उन्हाळा असतानाही उजनीचे पाणी पाटबंधारे विभागाने सीना नदी व कुरुल कॅनॉलमध्ये टेलएंडपर्यंत सोडले नाही, या प्रश्नांवरून दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख चांगलेच आक्रमक झाले.
River Conservation
River ConservationAgrowon

Solapur Irrigation News : सध्या तीव्र उन्हाळा असतानाही उजनीचे पाणी पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) सीना नदी व कुरुल कॅनॉलमध्ये टेलएंडपर्यंत सोडले नाही, या प्रश्नांवरून दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) चांगलेच आक्रमक झाले.

त्यांनी थेट शेतकऱ्यांसह शनिवारी (ता.१) सिंचन भवनासमोर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत इथून उठणार नसल्याचा इशारा दिला.

पण येत्या पाच-सहा दिवसात पाणी टेलएंडपर्यंत सोडण्याच्या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी माघार घेतली.

या आंदोलनात सीना भीमा संग्रह समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, संदीप टेळे, रामचंद्र बिराजदार, पंडित बुळगुंडे, राजुर सरपंच लक्ष्‍मण गडदे, औराद सरपंच शांतकुमार गडदे, सुभाष बिराजदार, विजयकुमार बिराजदार, हणमंत बिराजदार, सिद्धाराम ढंगापुरे श्रीशैल बिराजदार यतीन शहा यांच्यासह दक्षिण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

River Conservation
Ujani Dam : मे महिन्यात उजनी गाठणार तळ

यावेळी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व उपविभागीय अधिकारी शिरीष जाधव यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण शेतकरी आक्रमक दिसून आले.

कोर्सेगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी पोचलेच पाहिजे, हक्काचं पाणी मिळालेच पाहिजे, सिनेला पाणी आलेच पाहिजे, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, पाणी आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचं अशा घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या.

यावेळी आमदार देशमुख यांनीही पाटबंधारे विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एकीकडे उजनीतून भीमा नदीला पाणी सोडले जात आहे. दुसरीकडे सीना नदीत अजूनही पाणी आलेले नाही.

उन्हाळा असल्याने सीना काठच्या शेतकरी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, पाणी सोडले जाते. मात्र ते दक्षिण सोलापूर तालुक्यात शेवटपर्यंत येतच नाही, असे वारंवार आणि जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप केला.

River Conservation
Ujani Dam : पाणी पुरवठा योजनांसाठी ‘उजनी’तून भीमेत पाणी सोडले

आंदोलन अधिकाऱ्यांच्या विरोधात : आमदार देशमुख

आपण सत्तेत असतानाही आंदोलन करावे लागते ही खंत आहे. मात्र हे आंदोलन शासनाच्या विरोधात नसून तर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाच्या विरोधात आहे.

पालकमंत्र्यांनी पाच पाळ्या पाणी सोडा, असे सांगितले आहे. मात्र एक पाळीही पाणी कोर्सेगाव बंधाऱ्यापर्यंत आले नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा तीव्र आहेत. शेतकऱ्यांसाठी आपण हे आंदोलन अधिकाऱ्यांच्या विरोधात करत असल्याचे आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले.

आमदार देशमुखांचा उपमुख्यमंत्र्यांना फोन...

या आंदोलनावेळी आमदार देशमुख यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. त्यावेळी फडणवीस यांनी माझे आणि आमदार देशमुख यांची चर्चा झाली आहे, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आहे, पाणी चालू करतोय, लवकरच पाणी येईल, असे सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com