Radhanagari Dam
Radhanagari Damagrowon

Radhanagari Dam : राधानगरी, काळम्मावाडीतून विसर्ग, शेती पिकाला दिलासा

Kalammawadi Dam : राधानगरी धरणातून ८५०, तर काळम्मावाडी धरणातून (गैबी बोगदा) ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
Published on

Kolhapur Panchaganga River : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी राधानगरी धरणातून ८५०, तर काळम्मावाडी धरणातून (गैबी बोगदा) ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे भोगावतीसह पंचगंगा नदी दुतर्फा ओसंडून वाहत आहे.

शेतीसह पिण्याच्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. सध्या जेवढा पाण्याचा विसर्ग होतो तो राधानगरीपासून शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत ठिकठिकाणी अडवला जातो. त्यामुळे पंचगंगा नदीतून शिरोळ तालुक्याला पुरेसे पाणी जात नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने राधानगरी धरण आणि काळम्मावाडी धरणातील गैबी बोगद्यातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

काल(ता.०९) मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे चित्र आहे. वाढीव पाण्यामुळे शिरोळपर्यंत पाणी जाण्यास मदत होणार आहे. धरणात सध्या दीड टीएमसी पाणीसाठा आहे. जून महिन्यापर्यंत हे पाणी पुरणार आहे. पावसाळ्यापूर्वी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केले जाणार आहे.

Radhanagari Dam
Dam Work Rajapur : राजापुरातील नव्या धरणाचे काम रखडले, पाणीटंचाईची समस्या

तसेच, आवश्‍यक असणाऱ्या ठिकाणी पाणी सोडून धरणातील पाणीपातळी योग्य प्रकारे ठेवली जाणार आहे. दरम्यान, सोडलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यात नदीपात्रात ज्या-ज्या ठिकाणी वीजपंप रिकामे पडले आहेत ते पंप सुरू करून शेतीला पाणी देण्यास मदत होणार आहे.

शिरोळ तालुक्यासाठी पाणी देण्याबाबत वारंवार मागणी होत होती. दरम्यान, भविष्यातील पाण्याचे नियोजन करून राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

- स्मिता माने, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com