Malin Village : पुनर्वसन झाले, मात्र गावचे गावपण हरपले

Rehabilitation Village: पुनर्वसन झाले, मात्र गावचे गावपण हरपले आहे. गावाला पहिल्यासारखे रूप आलेले नाही. जुन्या गावात घराला घरे लागून होती. प्रत्येकाच्या सुख-दु:खात गाव सहभागी होत होते. आताची घरे काही अंतरावर आहेत. त्यातच अनेक घरे कुलूपबंद आहेत. त्यामुळे गाव रिकामे वाटते.
Malin Village
Malin VillageAgrowon
Published on
Updated on

Fulwade News: पुनर्वसन झाले, मात्र गावचे गावपण हरपले आहे. गावाला पहिल्यासारखे रूप आलेले नाही. जुन्या गावात घराला घरे लागून होती. प्रत्येकाच्या सुख-दु:खात गाव सहभागी होत होते. आताची घरे काही अंतरावर आहेत. त्यातच अनेक घरे कुलूपबंद आहेत. त्यामुळे गाव रिकामे वाटते. शहरासारखी प्रत्येकाची भिंत वेगळी, चूल वेगळी झाली आहे. नवीन गाव, घरे चांगली आहेत; पण आमची माणसेच सोबत नसल्याने या गावाला गावपण राहिले नाही, अशा भावना माळीणकर व्यक्त करीत आहेत.

माळीण (ता. आंबेगाव) येथे ३० जुलै २०१४ रोजी डोंगरकडा कोसळून गाव राड्यारोड्याखाली गाडले गेल्याची दुर्घटना घडली होती. यामध्ये सुमारे ५० घरे असलेल्या या गावातील १५१ नागरिकांचा, तर ९०० हून अधिक जनावरांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला आज (ता. ३०) ११ वर्षे पूर्ण होत असून, या स्मृतिदिनानिमित्ताने माळीणकरांशी संवाद साधला.

Malin Village
One Village One Wage: एक गाव एक मजुरी : अनुकरणीय निर्णय

यावेळी गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष राजू झांजरे म्हणाले, की जिवाला जीव देणारी माणसे दुर्घटनेत मृत्यू पावली. आता गावांत मोजकीच माणसे आहेत. या दुर्घटनेमुळे माळीणकरांच्या मनावर झालेल्या जखमा आजही कायम

असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पुनर्वसन झाल्यापासून अद्याप गावांतर्गत रस्ते दुरुस्ती झाली नाही. रस्ते उखडले आहेत.

Malin Village
Solar Village : सौरग्रामसाठी एक गाव दत्तक घ्या

‘‘धोकादायक गाव म्हणून येथील पसारवाडीच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने ३४ भूखंड तयार केले असून, त्याचे सपाटीकरणाचे काम बाकी आहे. हे सपाटीकरण पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पावसाळा आम्हाला जीव मुठीत घेऊनच काढावा लागणार आहे,’’ असे माजी सरपंच दिगंबर भालचिम म्हणाले.

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन बैठकीनंतर ग्रामविकास विभागाने ताबडतोब प्रकल्पग्रस्त, पुनर्वसन गावठाणे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करावीत, पायाभूत सुविधा द्याव्यात, असे आदेश दिले आहेत. मात्र पत्रव्यवहार करूनही माळीण गावठाण ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत झाले नाही. कोणत्या सीमा निश्‍चित केल्या नाहीत. त्यासंबंधित कागदपत्र ग्रामपंचायतीला दिले नाहीत. त्यामुळे गावातील कोणतेच काम करणे शक्य होत नाही.
रघुनाथ झांजरे, सरपंच, माळीण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com