Cotton Crop : सीसीआय’कडून कापूस खरेदीसाठी शेतकरी नोंदणी सुरू

The Cotton Corporation Of India Limited : भारतीय कापूस महामंडळा (सीसीआय)तर्फे या हंगामातील कापूस खरेदीच्या उद्देशाने सध्या शेतकऱ्यांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये ३३ खरेदी केंद्रांवर ही नोंदणी चालु आहे.
Cotton Crop
Cotton CropAgrowon
Published on
Updated on

Akola News : भारतीय कापूस महामंडळा (सीसीआय)तर्फे या हंगामातील कापूस खरेदीच्या उद्देशाने सध्या शेतकऱ्यांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. चालू हंगामामध्ये विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये ३३ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे. यंदा सीसीआयकडून कापसाला हमीदर प्रतिक्विंटल लांब धाग्यासाठी ७०२० रुपये, तर मध्यम धाग्यासाठी ६६२० रुपये दर दिला जाणार आहे.

Cotton Crop
Farmer Success Story : ‘लेमन व्हिलेज’ पोथरेने केले गावकऱ्यांना कर्जमुक्त

यंदाच्या हंगामात कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांची नावनोंदणीची प्रक्रिया खरेदी केंद्रावर सीसीआयमार्फत सुरू करण्यात आली. विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या आठ जिल्ह्यांमध्ये सीसीआयचे ३३ खरेदी केंद्र आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या ठिकाणी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये अकोला विभागीय कार्यालयांतर्गत मोडणाऱ्या अकोला जिल्ह्यात ७, अमरावती २, बुलडाणा ५, चंद्रपूर ३, नागपूर २, वर्धा ६, वाशीम २, यवतमाळ ६ अशी केंद्रे आहेत. तर उर्वरित कापूस उत्पादक जिल्ह्यांसाठी औरंगाबाद विभाग असून, तेथून नियोजन केले जात आहे.

Cotton Crop
Ravikant Tupkar : '...तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांच्या वाहने अडवणार'

सीसीआयची कापूस खरेदी दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. कारण या वर्षात पाऊस उशिरा झाल्याने पेरण्या लांबल्या. त्यामुळे कापसाचा सार्वत्रिक हंगाम सुरू झालेला नाही. केवळ मे अखेरीस किंवा जूनमध्ये लागवड झालेल्या पट्ट्यात कापूस वेचणी होत आहे. त्यामुळे बाजारात कापसाचा दरही अद्याप दबावात आहेत.

नवीन कापूस सध्या ६५०० ते ६७०० पर्यंत, तर जुना कापूस ७२०० पर्यंत मागितला जातो आहे. मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीला आल्यानंतर हे दर किती राहतात यावरही शेतकऱ्यांचे नियोजन अवलंबून आहे. गेले काही हंगाम बाजारात चांगला दर मिळाल्याने शासकीय खरेदीला ब्रेक लागला होता. यंदा खुल्या बाजारातील दर कमी राहिल्यास पुन्हा शासकीय खरेदीकडे ओढा वाढण्याची चिन्हे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com