GreatNet System
GreatNet SystemAgrowon

Grape Registration : ‘ग्रेटनेट’ प्रणालीत निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी सुरू

GreatNet System : युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता कीड व रोगमुक्त, उर्वरित अंश हमी देण्यासाठी सन २००४ पासून राज्यात अपेडाच्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात येते.
Published on

Nashik News : युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता कीड व रोगमुक्त, उर्वरित अंश हमी देण्यासाठी सन २००४ पासून राज्यात अपेडाच्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात येते.

द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी, तपासणी, कीड व रोगमुक्त हमी, ॲगमार्क प्रमाणीकरण फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण या सर्व बाबींचे ग्रेपनेट प्रणालीद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार ग्रेटनेट प्रणालीत निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.

 GreatNet System
Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

राज्यात द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रेसर असून, सन २०२३-२४ च्या हंगामात २८,४६० निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आली आहे. सन २०२४-२५ वर्षामध्ये फळे व भाजीपाला निर्यातीस चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत खास उपक्रम राबविण्यात येत आहे.

यामध्ये जिल्हास्तरावर कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच फळे व भाजीपाला ऑनलाइन नोंदणीसाठी फार्म रजिस्ट्रेशन मोबाइल अॅपचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे.

 GreatNet System
Grape Farmers : थकित खातेदारांना हवे कर्ज

निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना कीड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्ह्याला या वर्षी ४४,००० द्राक्ष बागांच्या नोंदणीचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. यासाठीच निर्यातक्षम द्राक्ष बागांची अपेडाच्या ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीवर १ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू झाली आहे.

त्यानुसार अधिकाधिक द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी बागांची नोंद करावी. यासाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com