PM Surya Ghar Yojana : पीएम सूर्य घर योजनेसाठी घरबसल्या करा ऑनलाईन नोंदणी ; अर्ज कुठे, कसा करायचा?

Rooftop Solar Scheme : देशातील वीज ग्राहकांवरील वीज बिलाचा ताण कमी करून पारंपरिक उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.
Rooftop Solar Scheme
Rooftop Solar Scheme Agrowon

Pune News : देशातील नागरिकांमध्ये पारंपरिक उर्जेचे महत्त्व आणि जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्य घर योजनेची घोषणा केली आहे. देशातील वीज ग्राहकांवरील वीज बिलाचा ताण कमी करून पारंपरिक उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.

या योजनेंतर्गत सुरूवातीच्या टप्प्यात एक कोटी घरांवर सोलर रुफटॉप बसविण्यात येणार आहे. नुकतीच योजनेत भाग घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या लेखात आपण योजनेसाठी अर्ज, पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता याबाबतची माहिती पाहणार आहोत.

काय आहे सूर्य घर योजना?

दिवसेंदिवस वीजेच वाढती मागणी लक्षात सरकारने आता पारंपरिक उर्जेचे महत्त लोकांना पटवून देण्यासाठी पंतप्रधान सूर्य घर योजना आणली आहे. वीजेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येतो.

अनेक गरीब परिवारांना त्यामुळे वेळच्यावेळी वीजबील भरणे शक्य होत नाही. या योजनेंर्तगत देशातील एक कोटी कुटुंबाना महिन्याला ३०० युनिटपर्यंत वीज मोफत पुरविण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेंर्तगत एक कोटी घरांना सवलतीच्या दरात सौर पॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Rooftop Solar Scheme
Kusum Solar Scheme : कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईट्सचा सुळसुळाट ; शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन

अनुदान किती?

या योजनेंतर्गत १ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी ३० हजारांचे अनुदान मिळणार आहे. तर २ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी ६० हजार आणि ३ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी लावणाऱ्या कुटुंबांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

Rooftop Solar Scheme
Rooftop Solar Scheme : रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा

योजनेसाठी काय आहे पात्रता?

 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय असला पाहिजे

 • सराकरी कर्मचाऱ्यांना या योनजेचा लाभ घेता येणार नाही.

 • वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त असू नये.

 • योजनेच्या लाभासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करता आली पाहिजे.

महत्त्वाची कागदपत्रे

 • रेशन कार्ड

 • उत्पन्नाचा दाखला

 • आधार कार्ड

 • वीज बील

 • रहिवाशी दाखला

 • बँक खात्याचा तपशील (पासबुक)

 • मोबाईल क्रमांक

 • पासपोर्ट आकारचे फोटो

योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा?

आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? आणि कुठे करायचा? योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही. घरबसल्या ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता. पुढील पध्दतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

 • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पंतप्रधान सूर्य घर योजनेच्या https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.

 • त्यानंतर होमपेजवर Apply for Rooftop Solar या टॅबवर क्लिक करा.

 • त्यानंतर आता तुमच्या समोर नवे पेज ओपन होईल. ज्यावर राज्य, जिल्हा, वीज वितरण कंपनी आणि वीज ग्राहक क्रमांक टाकून Next बटणावर क्लिक करा.

 • आता तुमच्या पुढे आलेल्या नव्या पेजवर नोंदणी अर्जाचा नुमना येईल. त्यावर आवश्यक ती सर्व माहिती भरून आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.

 • शेवटी Submit बटणावर क्लिक केल्यावर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अशा प्रकारे तुम्ही पंतप्रधान सूर्य घर योजनेसाठी अर्ज करू शकता. ही माहिती तुमच्यासाठी आवश्यक नसल्यास गरजूंपर्यंत पोहचवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com