Ahilyanagar News: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवड रेशीम विकास योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन अहिल्यानगरचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी केले आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले..राज्यात तुती लागवड करून रेशीम कोष निर्मितीमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होऊ शकतो. रेशीम उद्योगासाठी राज्यात अनुकूल वातावरण असून कमी क्षेत्रातही जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम उत्पादनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बारामती व नागपूर येथे कोष उत्पादनाची कामे सुरू आहेत. रेशीम उत्पादनांना दिवसेंदिवस मागणी वाढत असून शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी शासनामार्फत प्रोत्साहन देण्यात येत आहे..Maha Awas Abhiyan : क्रश सॅंडद्वारे ११ हजार ८६६ घरकुलांचे बांधकाम.अहिल्यानगर जिल्ह्यात तुती लागवड रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. यामध्ये तुती लागवड करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती, कृषी कार्यालय अथवा जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत नोंदणी करावी. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. योजनेअंतर्गत १ एकर क्षेत्रावरील तुती लागवड, संगोपनासाठी तीन वर्षांत ८९५ मनुष्यदिवसांची मजुरी दिली जाते..Maha Awas Abhiyan : महाआवास’ अभियानाचे जिल्ह्यास तीन पुरस्कार.२०२५-२६ च्या दरानुसार मजुरीपोटी २ लाख ७९ हजार २४० व साहित्यासाठी १ लाख ५३ हजार असे ४ लाख ३२ हजार २४० रुपये तीन वर्षांत अनुदान दिले जाते. यासाठी गावातील किमान ५ शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने ग्रामरोजगार सेवकाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रेशीम कार्यालयाकडे ५०० रुपये प्रति एकर नोंदणी शुल्क भरून नाव नोंदणी करावी व संबंधित कार्यालयाकडे मनरेगा योजनेतून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे..बहुभुधारकांसाठी ‘सिल्क समग्र २’ योजनासंदीप आगवणे यांनी सांगितले की, तुती लागवड रेशीम विकास योजना अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी असली तरी अन्य इतर शेतकऱ्यांना केंद्र पुरस्कृत या योजनेत सहभागी होता येईल. तुती लागवडीसाठी १ एकरा करिता ४५ हजार रुपये, सिंचन व्यवस्थेसाठी ४५ हजार रुपये, संगोपनगृह बांधकामासाठी २ लाख ४३ हजार ७५० रुपये, संगोपन साहित्यासाठी ३७ हजार ५०० रुपये व निर्जंतुकीकरण औषधीसाठी ३ हजार ७५० रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतात. सिल्क समग्र २ योजनेत २ एकर तुती लागवडीसाठीही अनुदान योजना राबविण्यात येते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.