Ethanol Demand : तेल कंपन्यांकडून ४०० कोटी लिटर इथेनॉलची मागणी

देशातील तेल कंपन्यांनी इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम (ईबीपी) अंतर्गत येत्या इथेनॉल वर्षाकरिता ४०० कोटी लिटर इथेनॉलची मागणी विविध राज्यांकडे नोंदवली आहे.
 Ethanol Rate
Ethanol RateAgrowon
Published on
Updated on

कोल्हापूर : देशातील तेल कंपन्यांनी (Oil Companies) इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम (Ethanol Blending Programe) (ईबीपी) अंतर्गत येत्या इथेनॉल वर्षाकरिता (Ethanol Year) ४०० कोटी लिटर इथेनॉलची मागणी (Ethanol Demand) विविध राज्यांकडे नोंदवली आहे. यंदा इथेनॉलचे उत्पादन (Ethanol Production) चांगले होईल या अपेक्षेने मागणीतही वाढ केली आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूतून सर्वाधिक इथेनॉलची मागणी नोंदवण्यात आली आहे.

 Ethanol Rate
Ethanol Production : इथेनॉल वाढीसाठी केंद्र सरकारचा बुस्टर

देशातील २३ राज्यांकडून कंपन्यांनी इथेनॉल पुरवठा अपेक्षित धरला आहे. ४०० पैकी १८४ कोटी लिटर्सची मागणी बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला आहे. उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला १२५ कोटी लिटर्सची मागणी आहे. या खालोखाल अतिरिक्त धान्यापासून तयार झालेले इथेनॉल, खराब धान्यापासून तयार झालेल्या इथेनॉलला मागणी नोंदवण्यात आली आहे. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीकरिता ही मागणी आहे.

केंद्राने गेल्याच आठवड्यात विविध घटकांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरामध्ये वाढ केली. ही दरवाढ झाल्यानंतर कंपन्यांनी राज्यांकडून इथेनॉलची मागणी नोंदवली. गेल्या दोन वर्षांपासून इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होत असल्याने यंदा मागणीतही कंपन्यांनी वाढ केली आहे.

 Ethanol Rate
Ethanol Rate : इथेनॉलच्या दरवाढीत केंद्र सरकारकडून भेदभाव

२०२१-२२ ला ३१६ कोटी लिटरची मागणी नोंदवण्यात आली होती. या पैकी २७२ कोटी लिटरचा पुरवठा झाला. यंदा कंपनीने धान्य डिस्टलरीज बरोबर दीर्घकालीन करार केला आहे. देशाने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करण्याचा कार्यक्रम वेगाने हाती घेतला आहे. पारंपरिक इंधनावरील खर्च वाचविण्यासाठी सरकारच्या वतीने मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत.

या अंतर्गत केंद्राने गेल्या तीन वर्षांत इथेनॉलचे दर प्रत्येक वर्षी दोन ते पाच रुपयांनी वाढवले आहेत. यामुळे या वर्षी इथेनॉलनिर्मिती व मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा केंद्रातील साखर कारखाने ४५ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादना करिता करतील शक्यता आहे.

उसाचे बहुतांशी क्षेत्र असणाऱ्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांतून बी हेवी मोलॅसिस व उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सर्वाधिक मागणी नोंदवण्यात आली. आसाम, बिहार, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, आदी राज्यातून धान्यावर आधारित इथेनॉलला मागणी नोंदवण्यात आली.

घटकानुसार मागणी

घटक मागणी (लिटर मध्ये)

बी हेवी मोलॅसिस : १८४ कोटी १६ लाख

ऊस रस : १२५ कोटी ५५ लाख

सी हेवी : ४९ लाख २० हजार

खराब धान्य : १५ कोटी ८६ लाख

जादा धान्य: ६९ कोटी ९ लाख

-----

प्रमुख राज्यानुसार एकूण मागणी(लिटरमध्ये)

महाराष्ट्र : ६५ कोटी ४२ लाख

उत्तर प्रदेश : ७१ कोटी २५ लाख

कर्नाटक : २३ कोटी ९८ लाख

तमिळनाडू : ३३ कोटी ११ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com