Dams Reservoir Update: धरणांतील विसर्गात घट

Dam Water Level: धरण क्षेत्रात पावसाची उघडीप झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांतील विसर्गात घट करण्यात आली आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी कमी होऊ लागली असून काही ठिकाणी मात्र जोरदार विसर्ग सुरू आहे. ग्रामस्थांना नदीपात्राजवळ न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Pune Dam
Pune DamAgrowon
Published on
Updated on

Pune News: पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांत पाण्याची अजूनही आवक सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी सोडण्यात आलेल्या अनेक धरणांतील पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली आहे. त्यामुळे नद्यांतील पाणीपातळी कमी झाली असून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.

गेल्या मे महिन्यात जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर जून महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. आतापर्यंत अनेक धरणांत ५० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. तर दोन धरणे शंभर टक्के भरली असून घोड, विसापूर, चिल्हेवाडी, वडिवळे, कासारसाई या धरणांत ७५ टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा झाला आहे. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

Pune Dam
Ujani Dam: ‘उजनी’तून भीमा नदीत १५ हजार क्युसेकने विसर्ग

गुरुवारी (ता.२६) सकाळी आठ वाजपर्यंत मुळशी, टेमघर, नीरा देवघर धरणक्षेत्रात मध्यम सरी बरसल्या. तर पिंपळगाव जोगे, माणिकडोह, डिंभे, चिल्हेवाडी, कळमोडी, भामा आसखेड, वडिवळे, आंध्रा, पवना, वरसगाव, पानशेत, गुंजवणी या धरणक्षेत्रांत हलक्या सरी कोसळल्या. तर येडगाव, वडज, घोड, विसापूर, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, वीर, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती.

आगामी काळात पाणी उपलब्ध होण्यासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग बुधवारपासून (ता.२५) कमी करण्यात आला आहे. मात्र, जशीजशी पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली, तसतसे धरणांतील पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली आहे.

Pune Dam
Dam Water Level: जूनमध्ये बहुतांश धरणांत निम्म्याहून अधिक साठा

सध्या घोड धरणातून सांडव्याला सर्वाधिक चार हजार ९६५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग घोड नदीत सुरू आहे. तर कळमोडी धरणातून सांडव्याला ५६१ क्युसेकने आरळा नदीत, वडिवळेतून दोन हजार १०३ क्युसेक इंद्रायणी नदीत, कासारसाईतून २०० क्युसेकने पवना, खडकवासलातून १ हजार ७३० क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला आहे. वीर धरणांतूनही २७ हजार ७९७ क्युसेकने सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

हा विसर्ग पाण्याच्या येव्यानुसार कमी-जास्त करण्यात येत आहे. उजनी धरणातून ४० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीतील पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रालगत जाऊ नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत. तसेच संबंधित ग्रामपंचायत यांनी अनियंत्रित विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com