Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Sugarcane Transport : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाळप हंगाम २०२३-२४ मधील ऊस तोडणी व वाहतूक खर्चाची माहिती व्हावी, यासाठी साखर आयुक्तालयाने साखर कारखानानिहाय ऊस तोडणी व वाहतूक खर्चाचा तपशील जाहीर केला आहे.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon
Published on
Updated on

Solapur News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाळप हंगाम २०२३-२४ मधील ऊस तोडणी व वाहतूक खर्चाची माहिती व्हावी, यासाठी साखर आयुक्तालयाने साखर कारखानानिहाय ऊस तोडणी व वाहतूक खर्चाचा तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील संत दामाजी व पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांचा मागील हंगामातील ऊस तोडणी व वाहतूक खर्च कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, २०२२-२३ च्या हंगामाच्या तुलनेत जिल्ह्यातील कारखान्यांचा ऊस तोडणी व वाहतूक खर्चात सरासरी १५० रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून येते. राज्यात प्रचलित पद्धतीनुसार कारखान्यांमार्फत ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणी करून शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या उसाची तोडणी व वाहतूक केली जाते.

Sugarcane Season
Sugarcane Season 2024 : ‘द्वारकाधीश’चे सहा लाख टन गाळपाचे उदिष्ट

ऊस तोडणी व वाहतुकीसाठी आलेला खर्च हा ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या रास्त व किफायतशीर दराच्या (एफआरपी) देय रकमेतून कपात करण्यात येतो. कारखान्यांचा ऊस तोडणी व वाहतूक खर्च जास्त असतो, असा आरोप सातत्याने विविध शेतकरी संघटनांकडून व्यक्त केला जातो.

या पार्श्‍वभूमीवर येत्या हंगामात कारखान्यांचा ऊस तोडणी व वाहतूक खर्च हा वाजवी असल्याची खात्री करून गाळपास ऊस देताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जवळच्या कारखान्यांची निवड करावी.

Sugarcane Season
Sugarcane Season 2024 : ‘हेमरस’ची वाढली गाळप क्षमता’

सरासरी ऊसतोडणी व वाहतूक खर्च शेतकऱ्यांना जास्त वाटत असेल, तर संबंधित कारखान्यांच्या कार्यक्रमानुसार परंतु स्वतः मालक ऊस तोडणी करून कारखान्यास ऊस गाळपासाठी नेता येईल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून कमीत कमी ऊस तोडणी वाहतुकीची रक्कम वजा व्हावी, या उद्देशाने साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी याबाबतचे परिपत्रक जाहीर केले आहे.

केंद्र सरकारने गतवर्षी १५० रुपयांनी एफआरपी वाढवली होती. साखर कारखान्यांनी सरासरी तेवढेच १५० रुपये तोडणी वाहतुकीमध्ये वाढवले आहेत, याचा अर्थ एफआरपी वाढली तरीही शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही दर वाढवून मिळणार नाही. काहीही झाले तरी शेतकऱ्यांचा फायदा होऊ द्यायचा नाही, हा उद्देश यामागे आहे.
-विजय रणदिवे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com