Sugarcane Season 2024 : ‘द्वारकाधीश’चे सहा लाख टन गाळपाचे उदिष्ट

Sugarcane Crushing : यंदाच्या हंगामात सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, उसाला भाव देण्यात कारखाना कमी पडणार नाही.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon
Published on
Updated on

Nashik News : यंदाच्या हंगामात सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, उसाला भाव देण्यात कारखाना कमी पडणार नाही. दोन टप्प्यांत मोबदला दिला जाईल, असे कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी जाहीर केले.

शेवरे (ता. बागलाण) येथील द्वारकाधीश कारखान्याचा २५ वा रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम सुरू झाला. संस्थापक अध्यक्ष शंकरराव सावंत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. या वेळी एकरी १०० टनांपर्यंत उसाचे उत्पादन घेतलेल्या एकनाथ साळवे, कौतिक बोरसे, सुनील सोनवणे, सुनील पाटील, चंद्रेश गावित यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन झाले.

Sugarcane Season
Sugarcane Season 2024 : आर्थिक विवंचनेतच हंगामाचा श्रीगणेशा

कार्यकारी संचालक सावंत म्हणाले, की ऊस उत्पादक हा केंद्रबिंदू मानून द्वारकाधीश कारखाना काम करीत आहे. नुसते लागवडीखालील क्षेत्र वाढवून उपयोग नसून प्रतिएकरी ऊस उत्पादन वाढवून किफायतशीर परतावा मिळण्यासाठी कारखाना प्रयत्नशील आहे.

कारखान्यामार्फत बेणे, रासायनिक, सेंद्रिय खते, औषधे आदी उधार तसेच बिनव्याजी वाटप केले जाते. कारखान्याच्या ऊसविकास योजनेची दखल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे व विस्मा या संस्थांनी घेऊन कारखान्यास ऊस विकासाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविले.

अध्यक्षीय भाषणात शंकरराव सावंत म्हणाले, की कारखान्याच्या ऊस उत्पादकांचे प्रतिएकरी उत्पन्न वाढविण्यासाठी कारखाना प्रयत्नशील असून त्यासाठी कारखान्यामार्फत एकरी १००.टनांकडे झेप हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचा फायदा ऊस उत्पादकांनी घ्यावा तसेच नवापूर तालुक्यातील सर्व उसाचे गाळप व्दारकाधीश कारखान्यात केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Sugarcane Season
Sugarcane Season 2024 : सोलापूर जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांना गाळप परवाने

जास्तीत जास्त प्रतिएकरी ऊस उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ऊस उत्पादकांना नवीन ऊस जातीचे प्लॉट, खोडवा, निडवाचे प्रात्यक्षिक प्लॉट दाखविण्यात आले. शेतकी अधिकारी विजय पगार, संचालक सावंत यांच्या हस्ते उसाने भरून आलेल्या पहिली बैलगाडी व ट्रकचे पूजन करण्यात आले.

राजेंद्र शिरवाडकर, दीपक सोनवणे, बाळासाहेब देवरे, राजेंद्र सोमवंशी, बाजीराव बोडके, चंद्रकांत महाजन, काशिनाथ नंदन, विशाल आढाव, सरला अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव भालेराव, बाळासाहेब कर्पे, शंकरराव साळुंके, भूषण नांद्रे, कैलास वाघ, अरविंद सोनवणे, सतीश सोनवणे बागलाण, कळवण, साक्री, निफाड,चाळीसगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com