Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी माती, पाणी प्रदूषण कमी करा

Water Pollution : शेतकऱ्यांनी शेतजमिनीचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन कृषी संशोधन केंद्र निफाड येथील मृद्‌ शास्त्रज्ञ डॉ. योगेश पाटील यांनी केले.
Soil sample
Soil sample Agrowon
Published on
Updated on

Nashik News : सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेल्या निरोगी जमीन, पाण्याची धारणक्षमता आणि उपलब्धता नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी शेतजमिनीचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन कृषी संशोधन केंद्र निफाड येथील मृद्‌ शास्त्रज्ञ डॉ. योगेश पाटील यांनी केले.

जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम भायगाव (ता. पेठ) येथे साजरा करण्यात आला. व्यासपीठावर मृद्‌ शास्त्रज्ञ डॉ. योगेश पाटील, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी संदीप वळवी, तालुका कृषी अधिकारी, अविनाश खैरनार,

भायगावच्या सरपंच शकुंतलाबाई चौधरी, पोलीस पाटील संपतराव भोंडवे, मंडळ कृषी अधिकारी करंजाळी विनायक पवार, कृषी पर्यवेक्षक श्री. विसपुते आणि कृषी सहायक सचिन पाटील, कैलास भोये उपस्थित होते.

Soil sample
Soil Fertility : मातीची काळजी, प्रयोगशीलता, बहुविध पद्धतीचा संगम

डॉ. पाटील म्हणाले, की संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने २०२३ या वर्षीची थीम ही ‘माती आणि पाणी- जीवनाचा स्त्रोत’ अशी जाहीर केली आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवून ठेवण्यासाठी माती आणि पाणी हे आवश्यक स्रोत आहेत आणि त्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाची आवश्यकता आहे.

पाण्याचा कार्यक्षम वापर, खते आणि कीटकनाशकांच्या शाश्वत वापराला चालना देणे, योग्य सिंचनपद्धती वापर, ड्रेनेज सिस्टम सुधारणा आणि माती आणि भूजल क्षारता पातळीचे निरीक्षण या गोष्टी शाश्वत कृषीपद्धती राखण्यासाठी आवश्यक आहेत.

देशातील शेतजमिनीचे दिवसेंदिवस घटत जाणारे प्रमाण, नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात होणारी धूप या सर्व गोष्टी टाळण्याची गरज आहे. त्यासाठी संवर्धित शेती, जमिनीची कमीत कमी मशागत, पिकांचे अवशेष न जाळता शेतातच कुजविणे या सर्व बाबीमुळे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून, मातीची धूप कमी होण्यास मदत होते.

जमिनीत अधिकाधिक पाणी मुरविता येईल, तसेच पिकांसाठी आवश्यक पोषक घटकांचे प्रमाणसुद्धा वाढविता येईल पर्यायाने जमिनीत पाणी मुरविलेले शुद्ध स्वरूपात उपलब्ध होईल, असे उपस्थितांना सांगितले.

Soil sample
Soil Fertility : सुपीक करूयात आपली जमीन

वळवी यांनी माती परीक्षणाचे महत्त्व विशद करून माती परीक्षण प्रयोगशाळेमार्फत माती व पाणी नमुना चाचणी करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी जागतिक मृदा दिनाचे आयोजनाचा उद्देश शेतकऱ्यांना विषद केला.

शास्त्रोक्त पद्धतीने मातीचा नमुना कसा काढावा याचे प्रात्यक्षिक माती परीक्षण प्रयोगशाळेतील कृषी पर्यवेक्षक श्री.विसपुते आणि कृषी सहायक सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन करून दाखवले.

कार्यक्रमप्रसंगी जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण सरपंच शकुंतलाबाई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक पवार यांनी केले, तर आभार कृषी सहायक कैलास भोये यांनी केले. कार्यक्रमास गावातील प्रगतिशील शेतकरी गावाचे पोलिस पाटील संपतराव भोंडवे, कृष्णा भोंडवे तसेच गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com