
Krushi Vibhag Krushi Sevak Recruitment 2023 : राज्यात कृषी सेवक पदासाठी भरती करण्यात येणार आहे. राज्यातील ९५२ जागा भरण्याचा सूचना कृषी विभागानं विभागीय कृषी कार्यालयाला दिल्या आहेत. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पात्र उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी पद्धतीनं अर्ज करता येणार आहेत.
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील कृषी सेवक पदासाठी भरती केली जात आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे आणि ठाणे या विभागांत भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे.
विभागानुसार रिक्त पदांची संख्या देखील जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर ३६५, नाशिक ३३६, ठाणे २४७, कोल्हापूर २५०, लातूर १७० संभाजी नगर १९६, अमरावती १५६ आणि पुणे १८२ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
पात्रता काय?
उमेदवाराकडे कृषी विषयांमधील पदविका वा पदवी असणे आवश्यक आहे. तसेच निवड झालेल्या कृषी सेवक पदासाठी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्त कृषी सेवकाचे काम समाधानकारक असेल तर पुढील दोन वर्षांसाठी पुन्हा कृषी सेवक म्हणून नियुक्त केलं जाणार आहे. तसेच कृषी सेवक पदासाठीचा कालावधी ३ वर्ष निश्चित करण्यात आला आहे.
वेतन किती?
कृषी विभागातील कृषी सेवकांच्या पदासाठी दर महिना १६ हजार रुपये वेतन निश्चित करण्यात आलं आहे. अर्ज करण्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या - https://krishi.maharashtra.gov.in/
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.