Punjab Wheat Procurement: पंजाबमध्ये १२४ लाख टन गव्हाची विक्रमी खरेदी!

Wheat Market: पंजाब सरकारने यंदाच्या हंगामात तब्बल १२४ लाख टन गव्हाची खरेदी करण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांना हमीभाव ₹२४२५ प्रति क्विंटल मिळणार असून, एका दिवसात थेट बँक खात्यात पैसे जमा होतील.
Wheat Market
Wheat MarketAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशानंतर गहू उत्पादनात आघाडीवर असलेल्या पंजाब राज्यात यंदाच्या हंगामात तब्बल १२४ लाख टन गव्हाची खरेदी केली जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारकडून ७०० अस्थायी बाजारांची उभारणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. २४२५ रुपये प्रति क्‍विंटल असा हमीभाव गव्हाला जाहीर करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशामध्ये ९६.४७ तर मध्य प्रदेशामध्ये ६३.६१ लाख हेक्‍टरवर रब्बी हंगामात गव्हाची लागवड होते. पंजाब राज्यात गव्हाखालील सरासरी क्षेत्र ३५.२६ लाख हेक्‍टर इतके आहे. मात्र सिंचनाच्या मुबलक सुविधा त्यासोबतच व्यवस्थापनातील बदलाच्या माध्यमातून या भागात गव्हाची उत्पादकता देशाच्या इतर राज्यातील उत्पादकतेच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकार स्तरावर देखील गव्हाची खरेदी केली जाते.

Wheat Market
Wheat Price: हमीभावापेक्षा अधिक दराने गहू खरेदीवर लखनऊ प्रशासनाचे लक्ष

यंदाच्या हंगामात राज्यात १२४ लाख टन गव्हाची खरेदी केली जाणार आहे. त्यासोबतच गेल्या हंगामातील पाच लाख टन साठा शिल्लक आहे. त्यानुसार पंजाब सरकारकडे १२९ लाख टन गव्हाचा एकूण साठा होणार आहे. या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामातील गव्हाची खरेदी एक एप्रिलपासून होईल. शासकीय धान्य खरेदीत साठवणूक त्यासोबतच खरेदीकामी आवश्‍यक बारदाना उपलब्धतेचा प्रश्‍न नेहमी उभा राहतो.

मात्र सरकारने या दोन्ही बाबी लक्षात घेता यंदा पुरेशा प्रमाणात बारदाना उपलब्धतेवर भर दिला आहे. त्यामुळे बारदान्याची समस्या संपूर्ण खरेदी दरम्यान उद्भवणार नाही, असे सांगितले जाते. पंजाबमध्ये गव्हाच्या खरेदीकामी ७०० तात्पुरत्या बाजाराची उभारणी करण्यात आली आहे. बाजारात गव्हाची खरेदी होताच त्याची तत्काळ उचल होत तो गोदामात साठवला जाणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल विक्रीसाठी आणताना तो पूर्णपणे वाळलेला आहे, याची खातरजमा करूनच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन प्रशासनिक अधिकाऱ्यांनी केली आहे. शेतीमालाचा दर्जा नसल्यास शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळेल.

Wheat Market
Wheat Production : गहू उत्पादनात उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर; तर महाराष्ट्राचा आठव्या क्रमांकावर

एका दिवसात मिळणार चुकारे

पंजाब सरकारकडून शेतकऱ्यांना २४ तासांत चुकारे देण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याकरिता बॅंकेकडून तब्बल २८ हजार ८९४ कोटी रुपयांची सीसी (कॅश क्रेडिट लिमिट) घेण्यात आली आहे. या पैशाचा उपयोग शेतकऱ्यांना चुकारे करण्याकामी केला जाणार आहे. थेट चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात होतील.

बाजारात या आहेत सुविधा

- पुरेशी वीज व्यवस्था.

- स्वच्छतागृह.

- शुद्ध पाणी.

- वैद्यकीय सुविधा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com