Loksabha Result 2024 : निंबाळकरांना विक्रमी आघाडी

Election Result Update : पाच वर्षांतील प्रभावी जनसंपर्काच्या जोरावर विद्यमान खासदार व शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळवत पहिल्या फेरीपासून विजयी आघाडी घेतली आहे.
Omraje Nimbalkar Vs Archana Patil
Omraje Nimbalkar Vs Archana PatilAgrowon

Dharashiv News : पाच वर्षांतील प्रभावी जनसंपर्काच्या जोरावर विद्यमान खासदार व शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळवत पहिल्या फेरीपासून विजयी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या मतदारसंघात काट्याटी टक्कर असताना निंबाळकर हे अडीच लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन आघाडीवर होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शरदचंद्र पवार व शिवसेना (उबाटा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची लोकांतील सहानुभूतीही कामी आली तसेच निष्ठेचे फळही त्यांना मिळाले.

Omraje Nimbalkar Vs Archana Patil
Loksabha Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये अखेरपर्यंत चुरस

त्यांना मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य पाहता ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याची चर्चा खरी ठरली आहे.सोयाबीनसह शेतीमालाला चांगला भाव न दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महायुतीबद्दल तीव्र नाराजी होती. पीकविम्यातली झालेल्या भेदभावामुळे शेतकरी संतप्त होते.

Omraje Nimbalkar Vs Archana Patil
Loksabha Election 2024 : साताऱ्यात उदयनराजेंचा ३२ हजार मतांनी विजय

त्याचाही फायदा निंबाळकर यांना निवडणुकीत झाला. मात्र, महायुतीचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातील पाचही विधानसभा मतदारसंघातून निंबाळकर यांना मताधिक्य मिळाले. पहिल्या फेरीपासून २२ व्या फेरीपर्यंत हे मताधिक्य कायम होते. यामुळे पहिल्या फेरीपासूनच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष सुरू केला होता.

विजयी उमेदवार - ओमप्रकाश निंबाळकर - शिवसेना (उबाटा)

पराभूत उमेदवार - अर्चना पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस

मताधिक्य - दोन लाख ६१ हजार ४०३ (२२ व्या फेरीअखेर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com