Loksabha Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये अखेरपर्यंत चुरस

Election Result Update : राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद, जालना व बीड या तीनही लोकसभा मतदार संघांत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद, जालना व बीड या तीनही लोकसभा मतदार संघांत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली.

इतर पक्ष आणि अपक्ष मात्र आपला फारसा प्रभाव टाकू शकले नसल्याचे चित्र दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीत पाहायला मिळाले. अनेक फेऱ्यांमध्ये कधी हा उमेदवार पुढे तर कधी तो असे सुरू होते. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार हे मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.

Loksabha Election 2024
Election Result 2024 : उत्तर प्रदेशात धावली ‘सप’ची सायकल

मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर झालेले आंदोलन आणि त्या दरम्यान लोकसभा निवडणुकीचे वाजलेले बिगूल राजकारण गरम करून गेले. आधीच शेतमालाचे दर, सिंचनाची समस्या, पीकविमा परताव्यांचे प्रश्न, दुष्काळी उपाययोजना, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांचा न दिसून आलेला परिणाम आदी प्रश्न तसेच मराठा आरक्षणविषयक मागणीच्या घडामोडीने बीड, जालना व छत्रपती संभाजीनगरमधील राजकारण ढवळून निघाले.

Loksabha Election 2024
Lok Sabha Election : 'अमर्याद पुरुषोत्तमा'चा मर्यादित विजय

साडेपाचपर्यंत उमेदवारांना मिळालेली मते

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ(फेरी १८ वी)

संदिपान भुमरे (शिवसेना)... ३४४६२३

चंद्रकांत खैरे (उबाठा)... २१४१९७

अफसर खान (वंचित आघाडी)...५०७७८

इम्तियाज जलील (एमआय एम)... २६२९०६

जालना लोकसभा मतदारसंघ(१७ वी फेरी)

डॉ. कल्याण काळे (मविआ, काँग्रेस).. ४१०५८०

रावसाहेब दानवे (महायुती भाजप)... ३५६२२०

बीड लोकसभा मतदारसंघ(फेरी क्रमांक ३१)

बजरंग सोनवणे (मविआ, राकाँ.शरद पवार गट)..६,७०७०८

पंकजा मुंडे (महायुती, भाजप) ..६,७०३०९

(भाजप उमेदवार पंकजा मुंडे ४०० मतांनी आघाडीवर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com