RBI Financial Literacy Week : ‘महिन्याचे बजेट करा, बचत करा स्मार्ट बना’ ‘आरबीआय’कडून आर्थिक साक्षरता सप्ताह

Reserve Bank Of India : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) ‘आर्थिक साक्षरता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय लक्ष्मीपुरी यांच्या वतीने पंचगंगा कृष्णा हॉल येथे वित्तीय साक्षरता सप्ताह झाला.
Financial Literacy Week
Financial Literacy WeekAgrowon
Published on
Updated on

Financial Literacy Week : कोल्हापूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) ‘आर्थिक साक्षरता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय लक्ष्मीपुरी यांच्या वतीने पंचगंगा कृष्णा हॉल येथे वित्तीय साक्षरता सप्ताह  झाला.

या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ‘आर्थिक समजूतदारपणा आणि महिलेचा समृद्धपणा’ या विषयावर लक्ष केंद्रीत केले असून यामध्ये गृहिणी, नोकरी करणाऱ्या महिला आणि उद्योजिका यासाठी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व कळावे अशी माहिती अग्रणी जिल्हा अधिकारी विशाल गोंदके यांनी दिली.

Financial Literacy Week
Financial literacy : बना आर्थिक साक्षर

यासाठी आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून महिन्याचे बजेट करा, बचत करा स्मार्ट बना आणि आर्थिक शिस्त पाळा असे आवाहन त्यांनी केले आहे. या बरोबरच रिजर्व बँक एकात्मिक लोकपाल योजनेचे महत्त्व, करन्सीबद्दलची, बँकेतील रकमेचे आर बी आय कडून ५ लाखापर्यंत विमा संरक्षण बद्दल माहिती ही दिली.

आरोग्य विमा, टर्म इन्शुरन्स आणि सरकारी हमी असलेली अपघाती विमा योजना व नैसर्गिक मृत्यू विमा योजना यांचे महत्त्व स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com