Papaya Processing : कच्च्या पपईतून अनेकांना रोजगार

शहादा, तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड होते. सध्या पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातील पपई सहसा व्यापारी खरेदी करीत नाहीत.
Papaya Crop
Papaya CropAgrowon
Published on
Updated on

Nandurbar News : शहादा, तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड (Papaya Cultivation) होते. सध्या पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातील पपई सहसा व्यापारी खरेदी करीत नाहीत.

लहान फळे व आकार नसलेल्या पपया कच्ची पपई प्रकिया उद्योग करणारे व्यापारी खरेदी करीत असून, त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत.

पपई उद्योगाने शेकडो आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर प्रक्रिया करण्याअगोदर निघणाऱ्या पपईच्या सालीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नदेखील मार्गी लागत असून, तो चारा नेण्यासाठी गोपालकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

Papaya Crop
Papaya Cultivation: पपई पिकात आंतरमशागतीला वेग

जिल्ह्यातील तापी नदीलगतचा पट्टा सध्या पपई उत्पादनात अग्रेसर असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी पपईला मिळणारा चांगल्या भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी पपई लागवडीवर भर दिला आहे. शहादा तालुका हा सध्या पपई हब म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

अशातच या ठिकाणी पपईवर प्रक्रिया उद्योग करून त्यातून नफा मिळविणारे व्यापारीदेखील परजिल्ह्यातून दाखल होत असल्याने या ठिकाणी पपईवर होत असलेल्या प्रक्रियेमुळे अनेकांना रोजगार मिळत असल्याचे चित्र आहे.

पपईपासून बनणाऱ्या चेरीसाठी या ठिकाणी कच्च्या पपईची साल काढून चिरून त्यात मीठ भरून ती जळगाव आणि अन्य जिल्ह्यांमधील उद्योगामध्ये पुरवठा केला जात आहे.

यातून व्यापाऱ्यांना हंगामात पाच ते सहा लाखांचा फायदा होत असल्याचे चित्र आहे. शहरालगत असलेल्या तिखोरा ते कलसाडी रस्त्यावर विविध व्यापाऱ्यांनी कच्च्या पपईवर प्रक्रिया उद्योग थाटला आहे.

Papaya Crop
Papaya Rate : पपईला मिळतोय 17 रुपये किलोचा दर

आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार

विशेष म्हणजे नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल भागात बेरोजगारीचे प्रमाण अधिक असल्याने या कामांसाठी मजूर वर्ग चांगल्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने यामुळे व्यापाऱ्यांचा हंगामही सुरळीत होत आहे.

अशातच पपईचे साल्टे काढले जात असल्याने ते गुरांना चाऱ्यासाठी आवश्यक असल्याने गोपालकदेखील चारा म्हणून संकलित करण्यासाठी प्रक्रिया उद्योगात आपली वाहने घेऊन दाखल होताना दिसून येत आहे.

सध्या पावसामुळे झालेली चाराटंचाई त्यातच पपईची साल विनामूल्य उपलब्ध होत असल्याने अनेक पशुपालांचे लाभ होत असल्याचे चित्र पपई उद्योगातून दिसून येत आहे. या ठिकाणी दररोज २०० ते ३०० कामगार काम करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com