Ratnagiri Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी पाऊस, रविवारी विश्रांती

Kokan Rain News : रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ८०.९६ मिमी पावसाची नोंद झाली.
Ratnagiri Rain Update
Ratnagiri Rain Update Agrowon
Published on: 
Updated on: 

Weather News : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने शनिवारी दिवसभर सरींवर सरी पडत बळीराजाला दिलासा दिला. पण रविवारी पुन्हा विश्रांती घेतली. कडीकडीत ऊन पडले असले तरीही समाधानकारक पावसामुळे शेतकरी शेतीच्या कामांना गुंतला आहे.

पावसामुळे शुक्रवारी महामार्गावर मोरी खचली तर, आंबा घाटात मोठा दगड कोसळून मंदिराचे नुकसान झाले. जयगड-सतकोंडीत वीज घरावर पडून महिला जखमी झाली.

Ratnagiri Rain Update
Marathwada Rain Update : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत पावसाची हजेरी

रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ८०.९६ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड ११२.६०, दापोली १०३.९०, खेड ८७.१०, गुहागर ४७.७०, चिपळूण ६२.००, संगमेश्‍वर ५५.९०, रत्नागिरी ८६.००, लांजा ११३.४०, राजापूर ६० मिमी नोंद झाली.

शनिवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाचा जोर रात्रीपर्यंत होता. वेगवान वाऱ्यासह सर्वच तालुक्यात थांबून थांबून सरी पडल्या. या पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात मोठा दगड गणपतीच्या मंदिरावर कोसळला. यामध्ये देवळाचे नुकसान झाले. मात्र आतील श्रींची मूर्ती व्यवस्थित आहे.

साखरपा मेढे येथे मोरी खचल्याने वाहतूक दोन तास खोळंबली होती. चिपळूण परशुराम नगर येथे गृहसंकुलात पाणी शिरले होते. तर पावस सातपऱ्या येथे पुलावरून तर मावळंगे येथे रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.

जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागल्यामुळे अनेक ठिकाणी भात पेरण्या रखडल्या होत्या. पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या संगमेश्‍वर, राजापूरातील शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com