Maratha Reservation : मराठा समाजाच्या नुकसानीला सर्व पक्षीय नेते जबाबदार : जरांगे

Manoj Jarange : ‘‘मराठा समाजाने ज्या नेत्यांना वर्षांनुवर्षे मोठे केले, त्याच नेत्यांनी मराठा समाजाचे नुकसान केले आहे.
Manoj Jarange
Manoj JarangeAgrowon
Published on
Updated on

Nagar News : ‘‘मराठा समाजाने ज्या नेत्यांना वर्षांनुवर्षे मोठे केले, त्याच नेत्यांनी मराठा समाजाचे नुकसान केले आहे. मराठा समाजाची शक्ती वापरून समाजाचे नुकसान करणाऱ्या नेत्यांना या वेळी धडा शिकवणार आहोत,’’ असा इशारा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ‘‘तुम्ही कितीही प्रयत्न करा मराठा समाजाची एकजूट आता तुटू शकत नाही,’’ असे जरांगे पाटील म्हणाले.

नगर येथे सोमवारी (ता.१२) मराठा समाजाची शांतता रॅली काढण्यात आली. या वेळी मनोज जरांगे पाटील बोलत होते. या वेळी जिल्हाभरातील लाखो मराठा समाजाचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.

Manoj Jarange
Manoj Jarange : मराठ्यांच्या लेकरांच्या आरक्षणासाठी घराबाहेर पडा

उपस्थितांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा एकच आहेत आणि ते एकच राहणार आहेत. सरकारमधील तसेच विरोधी पक्षातील काही लोकांना वाटते, की यांच्यामध्ये वाद आहे. परंतु मराठ्यात कोणताही वाद नाही. मराठ्याची एकजूट कोणीही तोडू शकत नाही. देशातील मराठा एक होऊ शकतो हे मराठा समाजाने दाखवून दिले आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange : 'मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागताच आलमट्टी विरोधात लढा उभारणार'

मराठा समाजाच्या जीवावर जेवढे नेते झाले, त्याच नेत्यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे वाटोळे केले आहे. काही लोकांना जाणीवपूर्वक राज्यात दंगली घडवायच्या आहेत, परंतु मी कसल्याही प्रकारची दंगल होऊ देणार नाही. मराठ्यांचा लढा संपेल असे काही लोकांना वाटत असेल, परंतु मराठ्यांचा लढा न्याय घेतल्याशिवाय संपणार नाही.

या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केली. ‘‘नेत्यांनी हेवेदावे दूर ठेवून एकमेकाला साथ द्यावी. ओबीसी आणि मराठ्यात कोणताही वाद नाही. त्यामुळे दोन समाजांत कोणी जरी वाद लावण्याचा प्रयत्न केला तरी त्यावर लक्ष न देता गाव पातळीवरील एकजूट कायम ठेवावी. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, कोकणात सत्ताधाऱ्यांचा सुपडासाफ करणार आहे, असेही जरांगे या वेळी बोलताना म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com