Farmers Protest : तिसंगी-सोनके तलाव भरून द्या; वाखरीत शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’

तिसंगी सोनके तलाव १०० टक्के भरून घेण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Farmers Agitation
Farmers AgitationAgrowon

Pandharpur - पंढरपूर तालुक्यातील ९ गावांसाठी महत्त्वाचा असणारा तिसंगी सोनके तलाव १०० टक्के भरून घेण्यात यावा या मागणीसाठी मंगळवारी (ता. १०) पंढरपूर- पुणे रोडवर वाखरी येथे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तलाव भरण्यास दिरंगाई केल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत घाईगडबडीत नीरा उजवा कालव्याच्या पाण्यातून तलाव न भरता बंद केल्यास १६ ऑक्टोबरपासून पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला.

Farmers Agitation
Pandharpur Development Plan : विकास आराखड्यात भावनांचा विचार करा

या वेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, माजी उपसभापती विष्णू बागल, विठ्ठलचे संचालक समाधान काळे, शेतकरी नेते समाधान फाटे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, युवासेनेचे रणजीत बागल, सचिन आटकळे, अतुल फाटे, सुधाकर फाटे, जोतीराम पोरे, नितीन बागल, श्रीरंग नागणे, शिवाजी नागणे, मारूती पोरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Farmers Agitation
Farmer Agitation : सातारा जिल्ह्यात बुधवारी ‘स्वाभिमानी’चे चक्काजाम आंदोलन

दरवेळी नीरा देवघर, भाटघर धरण भरल्यानंतर तलाव १०० टक्के भरून घेतला जातो. यंदा मात्र लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी सोयीची भूमिका घेतल्याने तलाव अद्याप भरलेला नाही. तलाव भरण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात असा सवाल समाधान फाटे यांनी उपस्थित केला.

टंचाईस्थितीत पाटबंधारे विभागाने तलाव भरून घ्यावा, यामुळे पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे ‘विठ्ठल’चे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले. सचिन पाटील यांनी सांगोल्याचे आमदार मतदारसंघापुरता विचार करीत असल्याचे सांगत, पंढरपुरातील गावे वाळवंट करायची आहेत, काय असा सवाल केला.

पंढरपूर तालुक्यावरच अन्याय का?
यंदा पंढरपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही, अशा स्थितीमध्ये गादेगाव, सोनके, वाखरी, उपरी, भंडीशेगाव, पळशी, शेळवे, खेड भाळवणी, कौठाळी, शिरढोण गावांसाठी असणाऱ्या तिसंगी तलावात केवळ ३० टक्के पाणीसाठा झाला आहे.

नीरा उजवा कालव्यातून तलावात १५० ते १७५ क्युसेकने पाणी सुरू असून, त्यामध्ये वाढ करावी. सांगोला तालुक्याला वेगळा आणि पंढरपूर तालुक्यात वेगळा न्याय, असे कशासाठी असा सवाल शेतकरी नितीन बागल यांनी उपस्थित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com