
Gondia News : तांदळाला मागणी नसल्यामुळे बाजारात रब्बी हंगामातील धानाचे दर दबावात आले आहेत. जाड धान वाणाला शासनाने २३०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असतानाच बाजारात मात्र जाड (ठोकळ) धानाचे व्यवहार अवघ्या १६०० ते १७०० रुपये क्विंटलने होत आहेत. मात्र बाजारात दर कमी असल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६०० ते ७०० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.
मे महिन्यात आलेल्या पावसामुळे धानाची प्रत बिघडल्याने हे घडल्याचा दावा केला जात आहे. बारीक वाणाला ग्राहकांची मागणी राहते. या उलट ठोकळ वाणाचे वितरण सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली अंतर्गत होते. जयश्रीराम या बारीक धान वाणाची लागवड पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्येच होत होती.
त्यामुळे या भागात उत्पादित या जातीच्या तांदळाला देशभरातून मागणी देखील असायची, असे चंद्रपूर, जिल्हा राइस मिल असोसिएशनचे अध्यक्ष जीवन कोटंमवार यांनी सांगितले. त्यानंतरच्या काळात गुजरात, तेलंगणा, हैदराबाद, रायचूर (कर्नाटक) या भागांतून शेतकऱ्यांनी जयश्रीराम या बारीक प्रतीच्या वाणाबद्दल माहिती घेतली. त्यासोबतच लागवडकामी या भागातून याचे बियाणे देखील ते घेऊन गेले. गेल्या तीन वर्षांत या जय श्रीराम वाणाखालील लागवड क्षेत्रात त्या राज्यांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे.=
सिंचनाची सोय असल्याने दोनवेळा ते उत्पादन घेतात. त्यासोबतच सिंचनामुळे त्यांची उत्पादकता देखील अधिक आहे. इतकेच नाही तर कमी कालावधीचे पीक असलेल्या वाणाची ते तीन वेळा लागवड करतात. परिणामी, त्यांच्याकडे धानाचा अतिरिक्त साठा असल्याने त्या भागात उत्पादित तांदळाचे दरही तुलनेत कमी आहेत.
५४०० रुपये प्रति क्विंटल असा दर पूर्व विदर्भात उत्पादित बारीक तांदळाला असताना देशाच्या इतर भागांत उत्पादित बारीक तांदळाला ४५०० ते ४७०० रुपये असा दर आहे. इतकेच नाही तर त्यांच्याकडील तांदूळ वाण जय श्रीरामपेक्षा बारीक आहे. त्या भागातील भौगोलिक स्थितीमुळे हे घडण्याची शक्यता आहे.
बारीक धान वाणाचे दर दबावात
बारीक धान वाणाचे उत्पादनात विदर्भाची आघाडी होती. आता मात्र देशाच्या अन्य भागात याचे उत्पादन होते. त्यामुळे गेल्या वर्षी बारीक धान वाणाला ३२०० रुपये क्विंटलचा दर होता. आता तो २८०० रुपयांवर आला आहे.
दुसरीकडे मे महिन्यात झालेल्या पावसामुळे उन्हाळी (रब्बी) धानाला फटका बसला. त्याचा दर्जाही खालावला, त्यामुळे बाजारात अशा हमीभाव २३०० रुपये असताना कमी दर मिळत आहे. हा जाड धान वाण असून याचे दर खुल्या बाजारात प्रत नसल्याने १६०० ते १७०० रुपये क्विंटलवर आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.