Karjat Rice Project: भात जाती जलद पैदास प्रकल्प मैलाचा दगड ठरणार

Research on Rice Varieties: प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे मुख्यमंत्री कृषी संशोधन निधीतून मंजूर झालेल्या भात जाती जलद पैदास प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पामुळे भात वाणांचे संशोधन वेगाने होऊन शेतकऱ्यांच्या गरजांना अधिक तत्परतेने उत्तर मिळणार आहे.
Regional Agricultural Research Centre, Karjat
Regional Agricultural Research Centre, KarjatAgrowon
Published on
Updated on

Karjat News: प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे ‘मुख्यमंत्री कृषी संशोधन व निधीअंतर्गत मंजूर झालेला भात जातींची जलद पैदास व वाणांच्या चाचण्यांबाबत संशोधन संरचना उभारणी प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी केले.

गतिमान पैदास प्रक्षेत्रावरील नियोजित स्थळी प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. हळदणकर बोलत होते. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे, विविध विभागाचे शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Regional Agricultural Research Centre, Karjat
Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

डॉ. हळदणकर म्हणाले, की देशातील मोजक्याच जलद पैदास संशोधन केंद्रांमध्ये कर्जतचा समावेश होणे ही गौरवाची बाब आहे. या तंत्रज्ञानामुळे भात जाती संशोधनात लागणारा कालावधी कमी होऊन शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप वाण संशोधनास चालना मिळून विद्यापीठाच्या नाव लौकिकात निश्चित भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Regional Agricultural Research Centre, Karjat
Agriculture Research : शेतकरी केंद्रित संशोधन, विकास कार्यक्रम हवा कुलगुरू डॉ. इंद्र मणी : वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक

डॉ. वाघमोडे यांच्या नेतृत्वात संशोधन केंद्राचा झपाट्याने कायापालट होत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. भात हे उसापेक्षा कमी पाणी लागणारे पीक असून त्यामुळे जमिनीत पाणी टिकून राहते. परिणामतः कोकणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नियोजित वेळेपूर्वी हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. वाघमोडे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे दक्षिण आशियातील विभागीय केंद्र असलेले वाराणसी, तमिळनाडूमधील कोईमतूर अशा मोजक्या केंद्रांत हा प्रकल्प सुरू आहे. महाराष्ट्रात कर्जत येथे रुपये ४४१ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाल्याने भात संशोधनाला निश्चित नवी दिशा मिळेल. कुलगुरू डॉ. संजय भावे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, नियंत्रक जोईस, विद्यापीठ अभियंता पूजा इंगवले (देसाई) आदींचे वेळोवेळी सहकार्य मिळाल्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com