Agriculture Research : शेतकरी केंद्रित संशोधन, विकास कार्यक्रम हवा कुलगुरू डॉ. इंद्र मणी : वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक

Scientific Advisory Committee Meeting : कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व जिल्ह्यातील सर्वच कृषी संलग्नित विभागांनी शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून शेतकरी केंद्रित संशोधन, विस्तार व विकास कार्य करावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.
Scientific Advisory Committee Meeting
Scientific Advisory Committee Meeting Agrowon
Published on
Updated on

VNMKV, Parbhani : छत्रपती संभाजीनगर : कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व जिल्ह्यातील सर्वच कृषी संलग्नित विभागांनी शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून शेतकरी केंद्रित संशोधन, विस्तार व विकास कार्य करावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे सोमवारी (ता. १७) २३ वी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. संचालक विस्तार शिक्षण डॉ. गिरधारी वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, एनएआरपीचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, लीड बँक व्यवस्थापक मंगेश केदार, विभागीय वनविकास अधिकारी श्रीमती कीर्ती जमदाडे,

Scientific Advisory Committee Meeting
Dr. Indra Mani : कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांना ‘एमिनेंट इंजीनियर अवार्ड’

कृषी तंत्र विद्यालय प्राचार्य डॉ. पंडित मुंडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनीषा हराळ, सहायक मत्स्यविकास अधिकारी श्रीमती पवार, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड आदींची उपस्थिती होती. याबरोबरच वैज्ञानिक सल्लागार समिती बैठकीचे सदस्य प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ तायडे, सुनंदा क्षीरसागर, शारदा कागदे, कय्युम शेख, छाया साबदे यांची देखील उपस्थिती होती.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व विभागांनी एकाच व्यासपीठावर येऊन प्रत्याभरण देऊन शेतकऱ्यांसाठी नियोजन करण्यासाठी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आवश्यक आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या गोदावरी सारख्या इतरही चांगल्या वाणांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येत आहे. अशाच हवामानाशी सुसंगत वाण विकसित करण्यास विद्यापीठामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.

विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.’’ डॉ. गिरिधारी वाघमारे म्हणाले, ‘‘बैठकीमध्ये देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे अवलोकन करून त्यानुसार पुढील कार्य अहवाल तयार करावा. तसेच सर्व विभागांसमवेत प्रभावीपणे विस्तार कार्य करावे. शेतकऱ्यांनी देखील विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम व इतर विस्तार कार्यक्रमांचे आयोजन केव्हीकेमार्फत करण्यात यावेत.’’

श्री. देशमुख म्हणाले, की कृषी विभागामार्फत विविध योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवल्या जात असून त्याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करून घ्यावा. डॉ. सूर्यकांत पवार, मंगेश केदार, कीर्ती जमदाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी प्रास्ताविक करून अहवाल सादरीकरण केले. या वेळी कृषी विज्ञान केंद्राद्वारे प्रशिक्षित जया साबदे, विकास लोळगे, शहादेव ढाकणे, सदाशिव गीते, बाळू सोनवणे, ज्ञानेश्वर गलधर, मनीषा चव्हाण, अनिता मोरे, मूलचंद पवार, राजेंद्र भवर, आबासाहेब भवर या प्रगतिशील शेतकरी कृषी उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com