
Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी अशा विविध वर्गवारीतील ५० हजारांहून अधिक ग्राहकांना गेल्या वर्षभरात नवीन वीजजोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ‘इझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पना आणली आहे. वीज ही आज मूलभूत गरज बनलेली असल्याने अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठ्याचा समावेश या संकल्पनेत करण्यात आलेला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर परिमंडलात महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेले निर्देश आणि वीज नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या कृती मानकांनुसार विहित कालावधीत नवीन वीजजोडणी देणे, अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासह ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात विविध वर्गवारीतील एकूण ५० हजार ४६६ नवीन ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या ४१ हजार ७६७ ही घरगुती ग्राहकांची आहे. या कालावधीत वाणिज्यिक वर्गवारीतील ५ हजार २७७ ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. नवीन वीजजोडणीत १ हजार ३०४ कृषी ग्राहकांचा समावेश असून औद्योगिक (लघुदाब) वर्गवारीतील हजार ९६ नवीन ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त सार्वजनिक सेवा, पाणीपुरवठा योजना, पथदिवे व इतर १ हजार २२ ग्राहकांचा यात समावेश आहे. परिमंडलांतर्गत या कालावधीत छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात १३ हजार ७०७, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात २२ हजार ५५९ व जालना मंडलात १४ हजार २०० नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ५० हजारांहून अधिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली ही समाधानाची बाब आहे. वीजजोडणी देण्याचा वेग आणखी वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच नियामक आयोगाच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी परिमंडलातील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध असल्याचे महावितरण कडून कळविण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.