
Dharashiv News: नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि. साईनगर रांजणी या कारखान्याने २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या उसाचा अंतिम दर ३०१० रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली.
नॅचरल उद्योग समूहाने शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन सदैव जास्तीत जास्त ऊसदर देण्याचा व शेतकऱ्यांमध्ये आर्थिक स्थैर्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे. कारखाना कार्यक्षेत्रात मॉन्सूनपूर्व पाऊस अत्यंत समाधानकारक झाल्यामुळे ऊस पिकाचे खत व्यवस्थापन व मशागतीसाठी ऊस बिलाचा अंतिम हप्ता अदा करण्यात येत आहे. तसेच नॅचरल शुगरने सदैव मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त दर देण्याचा पायंडा कायम ठेवला आहे.
गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या उसासाठी ३०१० रुपये दर देण्याचे निश्चित केले असून, तो मराठवाड्यातील सर्वाधिक दर असल्याचे श्री. ठोंबरे यांनी सांगितले.
कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये ४ लाख ७१ हजार टन ऊस गाळप केले असून, या गाळपास आलेल्या उसासाठी पहिला हप्ता २७०० रुपये प्रमाणे ऊस पुरवठादारांना अदा केला आहे. उर्वरित ३१० रुपयांचा दुसरा व अंतिम हप्ता शनिवारी (ता. ३१) संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याचेही श्री. ठोंबरे यांनी या वेळी सांगितले..
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.