Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

Ramoji Film City : रामोजी फिल्म सिटी आणि ईनाडूचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी (ता. ८) पहाटे ४.५० वाजता वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.
Ramoji Rao
Ramoji RaoAgrowon

Pune News : रामोजी फिल्म सिटी आणि ईनाडूचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी (ता. ८) पहाटे ४.५० वाजता वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उच्च रक्तदाब आणि श्‍वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ५ जून रोजी हैदराबादमधील नानकरामगुडा येथील स्टार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

१६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावात एका कृषी कुटुंबात जन्मलेल्या, रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वांत मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली. रामोजी राव एक भारतीय उद्योगपती, मीडिया उद्योजक आणि चित्रपट निर्माते होते.

Ramoji Rao
Indian Agriculture : पीक बदल, गोपालनातून रोहणवाडीची अर्थकारणाला गती

ते रामोजी समूहाचे प्रमुख होते. तेलुगू चित्रपटातील त्यांच्या कामांसाठी त्यांना दक्षिणेकडील चार फिल्मफेअर पुरस्कार, पाच नंदी पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते. २०१६ मध्ये पत्रकारिता, साहित्य आणि शिक्षणातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयूरी फिल्म डिस्ट्रिब्यूटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. रामोजी राव यांचे उषाकिरण मूव्हीज नावाचे प्रोडक्शन हाउसही आहे. या बॅनरखाली त्यांनी अनेक सुपरहिट तेलुगू चित्रपट दिले. रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.

रामोजीराव यांची कारकीर्द आणि सन्मान

रामोजी राव यांनी १९८४ मध्ये चित्रपटांची निर्मिती सुरू केली. २००० मध्ये ‘नुवी कवळी’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर २०१६ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Ramoji Rao
Agriculture Technology : ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्र फायदेशीर

त्यांचे योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

रामोजी राव यांच्या निधनाने भारताने प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील एक टायटन गमावला आहे. एक नावीन्यपूर्ण उद्योजक, त्यांनी ईनाडू वृत्तपत्र, ईटीव्ही न्यूज नेटवर्क आणि रामोजी फिल्म सिटी यांसह अनेक उपक्रमांची सुरुवात केली. या उद्योगातील त्यांचे योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामोजी राव यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

रामोजी राव यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो : पंतप्रधान मोदी

रामोजी राव यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकलो. रामोजी राव यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, सहवेदना या आशयाची पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे. तसेच राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com