Raju Shetti : 'सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांचा ऊस जाळून नेला, पण...'; राजू शेट्टी यांची साखर कारखानदांरावर टीका

Raju Shetti
Raju ShettiAgrowon

Pune News : माझ्या विरोधात साखर कारखानदार लोकसभा प्रचाराच्या मैदानात उतरले असून माझ्यावर टीका करत आहेत. पण जेंव्हा उस बिलांचा विषय येतो तेंव्हा ते नावच काढत नाहीत. शेतकऱ्यांना बाजूला सारत फक्त बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी (ता.२०) केली आहे. ते शिरसी (ता. शिराळा) येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी पोपट मोरे, राम पाटील, अॅड. शमशुद्दीन संदे, मानसिंग पाटील, देवेंद्र धस, संदीप राजोबा, राजू पाटील, रवि पाटील, काका रोकडे, अमोल गुरव कैलास देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी शेट्टी म्हणाले, 'कारखाना शेतकऱ्यांचा उस लवकर नेत नाही. शेतकऱ्यांकडे टोळ्या नाहीत, तोडणी यंत्रणांची कमी आणि बहुसंख्या टोळ्या पळून गेल्याने शेतकऱ्यांचा ऊस वाळवलेला आहे. पण हे कारखानदारांना दिसत नाही. कारखानदार आधी आपल्या बगलबच्च्यांचा ऊस नेतात. अन् सर्वसामान्य शेतकऱ्यांना ऊस जाळवा लागतो. त्यांना ऊस जाळून गाळपासाठी देण्यासाठी कारखानदार भाग पाडतात'. 'मात्र एखाद्या साखर कारखानदाराने स्वतःचा ऊस जाळून गाळपास नेलाय का? तसे उदाहरण असल्यास दाखवून द्या', असे आवाहन शेट्टी यांनी कारखानदारांना केले आहे.

Raju Shetti
Raju Shetti : 'सरकारने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत तर साखर कारखान्यांची साखर अडवणार'

'माझ्या वर काही महाभाग टीका करत आहेत की, राजू शेट्टी यांनी आंदोलन केले म्हणून उसाच्या तोडण्या उशीरा सुरू झाल्या. फेब्रुवारीनंतर दरवर्षी साखर कारखानदार ऊस जाळूनच नेतात. त्यात सभासद नसला की टनाला ३०० रूपये कमी करतात. ही शेतकऱ्यांची लूट नाही का? शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट असून शेतकऱ्यांनीच आता संघटीत होऊन लढा दिला पाहिजे. तरच शेतकरी चळवळ टिकेल. आपण देशाला अन्नधान्य पुरवतो. मात्र शेतकरी उपाशीची आहे', असे शेट्टी म्हणाले.

Raju Shetti
Raju Shetti : बैलगाडीतून जात राजू शेट्टींनी दाखल केला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज; जोरदार शक्तीप्रदर्शन

'शेत मालाला हमीभाव मिळाल्यास शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील युवकांना रोजगारासाठी मुंबईला जायची गरज भासणार नाही. यासाठी मला एमएसपीचा कायदा मंजूर करून घेण्यासाठी संसदेत जायचे आहे. शिराळा तालुका हा दुर्गम भाग आहे. उसाबरोबरच इतर पिके देखील याठिकाणी घेतली जातात. येथील शेतकऱ्यांची गुंट्याची शेती आहे. शेतीमालाला दर मिळत नाही. शेतकऱ्यांची या अवस्थेला राज्यकर्तेच जबाबदार आहेत', असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केली आहे.

ग्रामीण भागात रोजगार मिळतो तो केवळ शेतीमधूनच. नाहीच मिळाला तर लोकांना पुणे, मुंबईत नोकरीसाठी जावे लागते. शेतमालाला दर मिळावा म्हणून गेली ३० वर्षे संघर्ष करत असल्याचे शेट्टी म्हणाले

तसेच आपण खासदार असताना लोकसभेत दोन अशासकीय विधेयके मांडली गेली. शेतमालाला दीडपट हमीभाव, आणि कर्जमुक्ती ही दोन विधेयकांना अद्यापही मंजूर झालेली नाहीत. ती विधेयके मंजूर करून घेण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे. मग यासाठी लागेल ती किंमत मोजायला तयार असल्याचेही शेट्टी म्हणालेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com