Sangli Rain Update: पावसाने सांगलीतील द्राक्ष बागायतदार कोलमडले; छाटणी घेतलेल्या बागायतदार हतबल

Sangli Rain Forecast : जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या १७१ टक्के पाऊस झालाय. कृषी विभागाकडून नुकसानीचं पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती कृषीविभागाकडून देण्यात आली आहे.
Grapes Rain Damage
Grapes Rain DamageAgrowon
Published on
Updated on

Sangli Agriculture News : सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. द्राक्ष, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या १७१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचं पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती कृषीविभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार म्हणाले, "दररोज पाऊस पडतोय, दररोज वेगवेगळ्या प्रकारे शेतीचे नुकसान होत आहे. जिल्हा कृषी विभाग त्याचे पंचनामे करत आहे. या काळात आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर उभे आहोत. त्यांना सगळे सहकार्य केले जाणार आहे." अशी माहिती कुंभार यांनी दिली.’’

सांगली जिल्ह्यातील उत्पादकांना अवेळी पावसाच्या स्थितीचा मोठा फटका बसत आहे. छाटणी घेतलेल्या बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. पाऊस झाला की फवारणी घ्यावी लागते यामुळे औषध फवारणीने शेतकरी घाईला आला आहे.

या सगळ्यात उत्पादनात घट होण्याचीही भिती आहे. बागांमध्ये पाणी साचून राहात आहेत. त्यामुळे मुळांना फटका बसत आहे, अशा अवस्थेत घड चांगले वाढू शकत नाहीत. शिवाय, बागातून पाणी बाहेरच पडत नसल्याने अडचण झाली आहे, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

Grapes Rain Damage
Kolhapur Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यात डझनभर साखर कारखानदार उतरणार विधानसभेच्या रिंगणात, गळीत हंगामावर परिणामाची शक्यता

तीच अवस्था भाजीपाला उत्पादकांची आहे. पिके जवळपास कुजली आहेत. भाजीपाला उत्पादन जवळपास ठप्प झाले आहेत. पुढील आठ-दहा दिवसांत अशीच स्थिती राहिली तर या हंगामातील भाजीपाला पीक पूर्ण वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पालेभाज्या तर शोधून सापडेनात, अशी स्थिती आहे.

द्राक्ष अभ्यासक मारुती चव्हाण म्हणाले की, द्राक्षाची गळ, कुज सुरू झाली आहे. आद्याप छाटणीला फटका बसत आहे. उशिरा छाटणी झालेल्या बागांत गोळीबाळी प्रमाण वाढत आहे. मळी चालू नसल्याने हंगामच अडचणीत येण्याची शक्यता आहे. उत्पादन घटणार आहे. शेतकऱ्यांना द्राक्ष कसोशीने जपायला हवीत असे मत चव्हाण यांनी मांडले.’’

आतापर्यंत पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यातील आतापर्यंत तालुका निहाय पाऊस (मिमि) मिरज ९००.४, जत ६४४, खानापूर ७९४, इस्लामपूर १२७३, तासगाव ९५१, शिराळा १७९६, आटपाडी ६१८, कवठेमहांकाळ ८९८, पलूस ९५८, कडेगाव ८९२, एकूण सांगली जिल्ह्यात ९९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com