Garlic Rate : लसणाला ३०० रुपये किलो उच्चांकी दर

Garlic Arrival : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची येथील भाजी मार्केटमध्ये लसणाची आवक कमी जास्त होत आहे.
Garlic Rate
Garlic RateAgrowon
Published on
Updated on

Baramati News : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची येथील भाजी मार्केटमध्ये लसणाची आवक कमी जास्त होत आहे. त्यातच लागवड हंगाम सुरू असल्याने अधिक मागणी आहे. बाजार समितीत रविवारी (ता. १) ११० क्विंटलची आवक झाली होती.

तर उच्चांकी प्रति किलो ३०० रुपये, सरासरी २५० रुपये प्रति किलो भाव लसणाला मिळत आहे, अशी माहिती बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

बाजार समितीत लसूण खरेदी- विक्री करणारे दहा ते बारा अडते आहेत. बाजार समितीत लसणाची आवक प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय बारामती तालुक्यातूनही काही प्रमाणात आवक होते. साधारणपणे दररोज ५० ते १०० टनांची आवक येथे होत असते. दरवर्षी रब्बी हंगामात अनेक शेतकरी लागवडीचे नियोजन करतात.

Garlic Rate
Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

प्रामुख्याने लागवड केल्यानंतर तीन ते चार महिन्यांत लसूण काढणीला येतो. त्यानंतर काढणी करून तो योग्य पद्धतीने कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढ्या साठवणूक करत असतात. तर इतर कालावधीतही आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्याने विकत असतात.

त्यामुळे या कालावधीत साधारणपणे ६० ते २०० रुपये या दरम्यान दर असतात. काही शेतकरी रब्बी हंगामाच्या तोंडावर लागवडीच्या दृष्टिकोनातून जास्त प्रमाणात विकतात. त्या वेळी या कालावधीत अधिक दर मिळण्यास मदत होते.

रब्बी हंगामाच्या काळात लागवडीच्या दृष्टिकोनातून परराज्यातूनही मालाची आवक होत असते. परंतु चालू वर्षी परराज्यांतून कमी आवक होत आहे. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागांतून लसणाची आवक कमी येत आहे. त्यातच कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातून मागणी वाढली आहे. त्यामुळे पुणे, बारामती यांसह इतर जिल्ह्यांतील लसणाच्या दरात वाढ झालेली आहे.

Garlic Rate
Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

मागील एक महिन्यापासून आवक कमी होत असून, दरात चढउतार होत आहे. सध्या दर प्रति किलो २०० रुपयांच्या वर गेलेले आहे. त्याचबरोबर शेवग्याचे भावही तेजीत असून, शेवग्याला प्रति किलो कमाल ३०० रुपये व सरासरी २५० रुपये असा उच्चांकी दर मिळत आहे. त्यातच शेवग्याला कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मागणी वाढली आहे. त्यामुळे शेवग्याच्या दरात चांगलीच वाढ झालेली दिसून येते आहे.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे फळ भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील मार्केटमध्ये गवार, वांगी, मिरची, भेंडी, वाटाणा, दोडका, गाजर, दुधी भोपळा, कारले व इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांना चांगले दर मिळत आहेत. थंडीचा कडाका वाढल्याने बाजारात आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले आहेत.

बारामतीतील जळोची येथील मार्केटमधील लसणाची स्थिती, दर : (क्विंटलमध्ये)

तारीख -- आवक --- कमाल दर -- किमान दर -- सरासरी

१ डिसेंबर -- ११० -- ३०,००० -- १५,००० -- २५,०००

२८ नोव्हेंबर -- ६० -- ३०,००० -- १५,००० -- २५,०००

२७ नोव्हेंबर -- ५५ -- २८,००० -- १४,००० -- २२,०००

२६ नोव्हेंबर -- ५५ -- २८,००० -- १४,००० -- २२,०००

२५ नोव्हेंबर -- ४० -- २७,००० -- १४,००० -- २२,०००

२४ नोव्हेंबर -- ५० -- २८,००० -- १५,००० -- २२,०००

२३ नोव्हेंबर -- ६० -- २८,००० -- १५,००० -- २२,०००

१९ नोव्हेंबर -- ६० -- २८,००० -- १५,००० -- २२,०००

रब्बी हंगामात अनेक शेतकरी लसणाची लागवड करतात. या कालावधीत बाजार समितीत विक्री करण्याचे प्रमाण कमी-अधिक असते. सध्या लागवडीच्या कारणामुळे आवक कमी झाली असून परराज्यांतूनही आवक कमी आहे. त्यामुळे दरात वाढ झालेली आहे.
- सुनील पवार, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती
माझ्याकडे एकूण पाच एकर शेती आहे. त्यापैकी दरवर्षी कुटुंबाला पुरेल एवढ्या लसणाची लागवड करत असतो. परंतु चालू वर्षी बाजाराची मागणी लक्षात घेऊन मी तीन एकरांवर लागवड केली आहे. त्यासाठी एकरी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च आला आहे. पुढील काळात चांगला दर मिळाल्यास चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
- बाबाजी ठाकूर, लसूण उत्पादक शेतकरी, चांडोली, ता. खेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com