Satara Rain : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाला पावसाने झोडपले

Rain Update : पावसाने मंगळवारी (ता. ३०) जिल्ह्याच्या पश्चिम भागाला झोडपून काढले आहे. सातारा, महाबळेश्वर, जावळी, पाटण, कऱ्हाड तालुक्यांत सरासरी ३५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on
Updated on

Satara News : पावसाने मंगळवारी (ता. ३०) जिल्ह्याच्या पश्चिम भागाला झोडपून काढले आहे. सातारा, महाबळेश्वर, जावळी, पाटण, कऱ्हाड तालुक्यांत सरासरी ३५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. इतर तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. अनेक शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात काहीसा कमी झालेला पाऊस मंगळवारपासून जोरदार स्वरूपात हजेरी लावत आहे. सातारा, महाबळेश्वर, जावळी, पाटण, कऱ्हाड तालुक्यांतील अनेक गावांना त्याने झोडपून काढले आहे.

Rain Alert
August Monsoon Rain : ऑगस्टमध्ये विदर्भ, मराठवाड्यात कमी पाऊस; ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार: हवामान विभाग

मंगळवारी दिवसा पावसाचा जोर कमी होता. मात्र मध्यरात्रीपासून त्याचा जोर वाढण्यास सुरवात झाली. संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीपाणी झाले आहे. अनेक शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागले आहेत.

Rain Alert
Monsoon Rain : पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; विदर्भात आणि कोकणात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

पाणी वेगाने वाहत असल्याने शेतातील बांधबंदिस्ती व रस्ता खचल्याने नुकसान झाले. वाई, खटाव, कोरेगाव तालुक्यांत काही ठिकाणी पावसाच्या दमदार सरी कोसळत होत्या. माण, फलटण, खंडाळा या तालुक्यांत मात्र तुरळक पाऊस आहे.

तालुकानिहाय पाऊस (मि.मी)

सातारा – ३६.९, जावळी – ३४.० , पाटण – ४६.८, कराड –३६.४, कोरेगाव –१५.९, खटाव १३.०, माण – ५.८, फलटण – ३.७, खंडाळा – ६.६, वाई – १४.०, महाबळेश्वर – ४७.०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com