
Parbhani News : जून महिन्यात परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिली आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. रविवारपर्यंत (ता. २२) या दोन जिल्ह्यांतील ८२ पैकी १० मंडलांत २५ मिलिमीटरपेक्षा कमी, २९ मंडलांत २५ ते ५० मिमी, ४१ मंडलांत ५० ते ९० मिमी तर केवळ २ मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.
परिणामी खरिपाच्या पेरण्या रखडल्या असून १ लाख ९८ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून ६ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्र नापेर आहे. अनेक भागांत बियाण्याची उगवण व्यवस्थित होत नाही. दुबार पेरणी करावी लागणार आहे. परंतु चांगली उगवण झालेल्या भागातील शेतकरी आंतरमशागतीची कामे करत आहेत. पिकांना पावसाची नितांत गरज आहे.
परभणी जिल्ह्यात रविवारपर्यंत (ता. २२) सरासरी १०६.६ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४५.७ मिमी (४२.९ टक्के) पाऊस झाला. २०२४ मध्ये रविवारपर्यंत १२३.५ मिमी (१२१.४ टक्के) पाऊस झाला होता. यंदा आजवर जिल्ह्यातील ५२ पैकी १ मंडलांत १०० पेक्षा जास्त, १८ मंडलांत ५० ते ९० मिमी, २४ मंडलांत २५ ते ५० मिमी पाऊस झाला असून ९ मंडलांमध्ये २५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला.
कासापुरी मंडलात सर्वाधिक १०४.४ मिमी तर सर्वांत कमी चिकलठाणा मंडलात १० मिमी पाऊस झाला. हिंगोलीत रविवारपर्यंत (ता. २२) सरासरी १२४.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६४ मिमी (५१.६ टक्के) पाऊस झाला.
२०२४ मध्ये ८५.२ मिमी (७२ टक्के) पाऊस होता. यंदा आजवर जिल्ह्यातील ३० पैकी एका मंडलात १०० पेक्षा जास्त, २३ मंडलांत ५० ते ९० मिमी, ५ मंडलांत २५ ते ५० मिमी पाऊस झाला. एका मंडलात २५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. हट्टामध्ये सर्वाधिक १४३ मिमी तर साळणात सर्वांत कमी २१ मिमी पाऊस झाला.
मंडलनिहाय पाऊस (मिमी)
१०० मिमीपेक्षा जास्त ः कासापुरी १०४.४, हट्टा १४३ (एकूण २)
५० ते ९० मिमी ः परभणी ८१.४, परभणी ग्रामीण ६७.६, पेडगाव ५८.८, जांब ५३.२, पिंगळी ५९.२, जिंतूर ५१.५, सावंगी म्हाळसा ६२.९, पाथरी ५९.३, हादगाव ८२.४, पिंपळदरी ५१.६, बनवस ५७.६, पेठशिवणी ७६.२, रावराजूर ६२.४, पूर्णा ५७.५, ताडकळस ७१, कात्नेश्वर ८०.१, चुडावा ८५.५, कावलगाव ७२.३, हिंगोली ५६.७, नरसी नामदेव ७८.३, सिरसम ५६, माळहिवरा ६५.८, खंबाळा ६५.८, कळमनुरी ८४.२, वाकोडी ६४.८, नांदापूर ६६.८, आखाडाबाळापूर ८४, डोंगरकडा ७६.५, वारंगा ७५.८, वसमत ७५.५, आंबा ७०.३, हयातनगर ७१.८, गिरगाव ५१.९, टेंभुर्णी ५५, कुरुंदा ५२.८, सेनगाव ६६.२, गोरेगाव ५४, आजेगाव ६२.२, साखरा ६३.५, पानकन्हेरगाव ७८.७, हत्ता ६७.७.
(एकूण ४१). २५ ते ५० मिमी ः झरी ३८.८, सिंगणापूर ४२.३, दैठणा ३०.७, टाकळी कुंभकर्ण ४२.८, बामणी ३६.९, वाघी धानोरा ४५.८, दूधगाव ३४.५, सेलू ३४.४, देऊळगाव गात ४१.७, वालूर ३२.४, मानवत ४२.५, केकरजवळा २८.५, कोल्हा ३९.२, ताडबोरगाव ४२.८, आवलगाव २८.२, शेळगाव २८.२, वडगाव ३८.४, गंगाखेड २८.२, महातपुरी २९.६, माखणी ३९.४, राणीसावरगाव ४९.२, पालम ४७.३, चाटोरी ४९.२, लिमला ४२.१, बासंबा ४३.५, डिग्रस कऱ्हाळे ४२.२, औंढा नागनाथ २७.८, येळेगाव ४६.७, जवळा बाजार ४७.८ (एकूण २९).
१ लाख ९८ हजार हेक्टरवर पेरणी
खरीप २०२५ मध्ये शुक्रवारपर्यंत (ता. २०) परभणी जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ४६८ पैकी १ लाख ५१ हजार ५६२ हेक्टरवर (२९.२३ टक्के) पेरणी झाली. त्यात कपाशीची ७५ हजार ५४१ हेक्टर लागवड, सोयाबीनची ६८ हजार ५६२ हेक्टर, तुरीची ५ हजार ३४९ हेक्टर, मुगाची १ हजार ३२० हेक्टर पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात ३ लाख २४ हजार ८७३ पैकी ४६ हजार ५०५ हेक्टरवर (१४.३१टक्के) पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनची ३४ हजार १५८ हेक्टर पेरणी तर कपाशीची १० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.